Next
‘कचरा व्यवस्थापनाबाबत विकसकांची सहकार्याची भूमिका’
शांतिलाल कटारिया यांची ग्वाही
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य धोरणे न आखल्याने, महाराष्ट्रासह अन्य सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दंड आकारत बांधकामे स्थगितीचे आदेश दिले आहेत. याविषयी अद्यापही संभ्रम आहे. राज्यसरकारने यासाठीच्या सूचना दिल्यास आम्ही त्याचे पालन करू;तसेच याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करू’, अशी ग्वाही ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी दिली.

‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया
कटारिया पुढे म्हणाले, ‘घनकचरा व्यवस्थापनाच्या सर्व नियमांचे आम्ही पालन करत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. आम्ही मागील दोन वर्षांपासून घनकचरा व्यवस्थपनाबाबतच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत. राज्यसरकारकडेही घनकचरा यासंदर्भात प्रभावी धोरण असून, राज्य सरकारला अपेक्षित सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. महाराष्ट्रातील घनकचऱ्याची समस्या फार मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, राजकीय इच्छाशक्ती व प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या वास्तवाची क्रेडाईला जाणीव असल्याने याबाबत नियम पाळण्यात, जनजागृती करण्यात क्रेडाईने कायमच पुढाकार घेतला आहे.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search