Next
भारताने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल हिमायतनगरमध्ये आनंदोत्सव
शिवतेज मित्र मंडळातील तरुणांनी फटाके फोडले
नागेश शिंदे
Wednesday, February 27, 2019 | 11:05 AM
15 0 0
Share this article:

आनंदोत्सव साजरे करताना शिवतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते

हिमायतनगर : भारतीय हवाई दलाने पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे पाकिस्तानला दिले आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा तीन हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड मुळासकट नष्ट केला. भारताने केलेल्या या कारवाईचा हिमायतनगर शहरातील शिवतेज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीपीआरएफ) जवानांना लक्ष्य करत  दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता आणि संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत काल पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यात ३५० दहशतवादी यमसदनी धाडले गेले.

भारताने केलेल्या या कारवाईबद्दल देशभरातून कौतुक करण्यात आले आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये शिवतेज मित्र मंडळाने या कारवाईचे स्वागत करत शहरातील परमेश्वर मंदिरासमोर फटाके फोडून आंनद व्यक्त केला. ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असे नारे या वेळी देण्यात आले.

या वेळी मंडळाचे संस्थापक शुभम दंडेवाड, तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, उपाध्यक्ष आकाश वानखेडे, हनुमान आरेपल्लू, शंकर जाधव, सावन रावते, शुभम हरडपकर, अक्षय पाटील, अरविंद वानखेडे, आदर्श हेंदे, राहुल डांगे, अक्षय निर्मले, रेणू वाढोनकर, शत्रू हेंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search