Next
‘सीए इन्स्टिट्यूट’तर्फे रत्नागिरीत कार्यक्रम
BOI
Saturday, May 18, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीत ‘सीए इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना सीए मंदार गाडगीळ.

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शहरातील व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सीए मंदार गाडगीळ यांनी ‘आयकर रिटर्न्स फॉर्म्स’बद्दल माहिती दिली. या वेळी सीए, कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम दोन सत्रांत झाला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना सीए गाडगीळ म्हणाले, ‘या वर्षीच्या आयकर रिटर्न्स फॉर्मसमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. करदात्यांकडून विविध प्रकारची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपनी व डायरेक्टर विषयीची माहिती, अनलिस्टेट शेअर्स असल्यास त्याची माहिती, वाहतूकदारांकडून प्रत्येक गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर व त्याच्या वाहतूक क्षमतेची माहिती मागितली आहे. त्याचबरोबर शेती उत्पन्न जास्त असणार्‍या व्यक्तींकडून त्याच्याकडे असणार्‍या सर्व शेतजमिनींची माहिती नवीन करपत्रकात देणे बंधनकारक केले आहे. या व्यतिरीक्त करदात्याने जमीन अथवा इमारत विकली असल्यास ती जमीन अथवा इमारत खरेदी करणार्‍याचे नाव व पॅन नंबर देणेही बंधनकारक केले आहे.’


‘नफा-तोटा व ताळेबंद भरताना त्यामध्येही महत्त्वाचे बदल केले आहेत. भागीदारी संस्थाना भागीदार अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतलेली कर्ज ताळेबंदामध्ये स्वतंत्र दाखवायची आहेत. त्याचबरोबर या वर्षी नफा-तोटा पत्रक देताना त्याचे मॅन्युफ्कॅचरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट असे भाग करून ढोबळ नफा रिटर्नमध्ये स्वतंत्र दाखवून त्यातून इतर खर्च वजा करून मग निव्वळ नफा दाखवायचा आहे. इंट्राडे शेअर्स व्यवहारांचा हिशोब स्वतंत्रपणे करपत्रकात दाखवावा लागणार आहे. एकंदरीतच या वर्षाची आयकर रिटर्न्समध्ये अनेक प्रकारची वाढीव माहिती ही द्यावी लागणार आहे,’ अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.


सीए इन्स्टिट्यूटचे शाखा अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर यांनी प्रास्ताविक केले. सीए केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. वक्त्यांची ओळख सीए शैलेश काळे यांनी करून दिली. सीए वरद पंडित यांनी आभार मानले. या वेळी सीए श्रीकांत वैद्य, सेक्रेटरी सीए आनंद पंडीत, सीए प्रसाद आचरेकर, सीए अभिजीत चव्हाण आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search