Next
‘होंडा’तर्फे ‘गोल्ड विंग’च्या डिलिव्हरीला सुरुवात
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this story

जयपूर : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने येथील एका कार्यक्रमात टूरर्स किंग ‘गोल्ड विंग’ची डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली. ‘२०१८ गोल्ड विंग’ने २०१८ ऑटो एक्स्पोद्वारे भारतात पदार्पण केले.

‘२०१८ गोल्ड विंग’ ही हलकी, अधिक शक्तिशाली व अतिशय निम्बल आहे. या टूररमध्ये, नव्याने विकसित केलेल्या हॉरिझोंटली-अपोज्ड सिक्स-सिलिंडर इंजिन, सेव्हेन-स्पीड ड्युएल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) अशा क्रांतीकारी तंत्रज्ञानाचा समावेश आहे व डबल विशबोन फ्रंट सस्पेन्शन असलेली पहिली होंडा आहे.

यानिमित्ताने बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’च्या सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘होंडा टू-व्हीलर्स इंडिया ऑटो एक्स्पो पॅव्हेलिअनमध्ये ‘२०१८ गोल्ड विंग’ शोस्टॉपर होती. प्रचंड प्रतिसाद व अंदाजे ३५ बुकिंग मिळाल्यानंतर, ‘गोल्ड विंग’ची पहिली डिलेव्हरी दिल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या क्रांतीकारी मॉडेलमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये जगातील कोणत्याही पहिल्या मोटरसायकलवरच्या ‘अॅपल कारप्ले’चा समावेश असून ते नव्या सात-इंच टीएफटी डिस्प्लेवर उपलब्ध आहे.’

आधुनिक ड्युएल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी), थ्रॉटल बाय वायरद्वारे (टीबीडब्लू) क्रुज कंट्रोल, इलेक्ट्रिक विंडस्क्रीनचा अँगल व उंची कमी-जास्त करण्यासारखी, सात-इंच टीएफटी कलर डिस्प्ले, फुल एलईडी लाइटिंग व ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटर्स, स्मार्ट की कंट्रोल ‘गोल्ड विंग’ची मुख्य वैशिष्ट्ये आहेत; तसेच अॅपल कारप्ले इंटिग्रेशनमुळे आयफोन युजरना त्यांचा स्मार्टफोन गोल्ड विंगशी कनेक्ट करणे शक्य आहे. ‘गोल्ड विंग’ कँडी आर्डंट रेड कलरमध्ये व २६ लाख ८५ हजार रुपयांत (एक्स-शोरूम, दिल्ली) उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link