Next
भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड
प्रेस रिलीज
Tuesday, November 13 | 01:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची मुंबई आयआयटीच्या रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. गौरव गोयल (बीटेक सिव्हिल), सुनाथ खाडिलकर (बीटेक-आयटी), आदर्श कुमार (बीटेक-इलेक्ट्रिकल), श्रुती माने (एमटेक सिव्हिल) अशी त्यांची नावे असून, प्राचार्य आणि अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

गौरव गोयलसुनाथ खाडिलकरया विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रति महिना दहा हजार पाठ्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयाला आयआयटीने मान्यता दिली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनकार्य डिसेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. या विद्यार्थ्यांना प्रा. पंकज गुप्ता, प्रा. मनसा बेहेरा, प्रा. रश्मी गुप्ता, प्रा. आनंद राव यांनी मार्गदर्शन केले.

आदर्श कुमारश्रुती मानेया प्रसंगी बोलताना डॉ. भालेराव म्हणाले, ‘तंत्र शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबर संशोधनाचेही महत्त्व आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक कौशल्य आणि दृष्टिकोन तयार करण्यासाठी या इंटर्नशिपचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांची प्रतिभा फुलून येईल आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव मिळेल. यासाठी पोषक वातावरण तयार करणे महत्त्वाचे ठरते.’

‘संशोधनासाठी संधी मिळणे हे आमचे स्वप्न होते. उत्तम संशोधन करून आम्ही संधीचे सोने करू,’ अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link