Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारले ‘भाषाबन’
८० देशांमधील १८० साहित्यिकांनी लावली रोपे
BOI
Friday, September 28, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

‘भाषाबन’ प्रकल्पासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. एन. एस. उमराणी, अशोक वाजपेयी, गुलाम मोहमद शेख, ‘पेन इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर, अध्यक्षा जेनिफर क्लेमंट, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, वसंत डहाके आदी मान्यवरांनी विविध रोपे लावली.पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये २८ सप्टेंबर २०१८ रोजी जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारले. ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध ८० देशांतील १८० साहित्यिकांनी येथे रोपे लावली. जगातील सुमारे सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणारे अनोखे ‘भाषाबन’ येथे साकारले असून, जानेवारी २०१९ पासून ते लोकांसाठी खुले होणार आहे. 

या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अशोक वाजपेयी, गुलाम मोहमद शेख, आशिष नंदी, तसेच ‘पेन इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर व अध्यक्षा जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, वसंत आबाजी डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
 
भाषाबनामध्ये झाडांच्या मधून जाणारा रस्ता असून, यावरून फेरफटका मारताना ध्वनिफितींच्या माध्यमातून भारतातील वेगवेगळ्या भाषांमधील गाणी, लोककथा, कविता, विनोद ऐकण्याची संधी मिळणार आहे. पेन इंटरनॅशनल काँग्रेसची ही भारतामधील पहिलीच परिषद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिषदेचे ‘नॉलेज पार्टनर’ आहे.

 
(ही बातमी इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search