Next
दत्ता टोळ
BOI
Thursday, December 21 | 04:00 AM
15 0 0
Share this story

दत्ता टोळप्रसिद्ध बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचा २१ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
................................
२१ डिसेंबर १९३५ रोजी जन्मलेले दत्ता टोळ हे खासकरून बाळगोपाळांसाठी लिहिणारे लेखक. त्यांनी अमरेंद्र दत्त असं टोपण नाव वापरूनसुद्धा काही लेखन केलं होतं. २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली. अमृतपुत्र विवेकानंद, कारगिलच्या युद्धकथा, महाराष्ट्राचे मानकरी, संस्कारकथा, तेजस्वी पत्रे, वादळ वाटेवरील सोबती, अक्षरदीप, बागुलबोवा गेला, भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, जय मृत्युंजय, कल्पनाराणी, मृत्युंजयाच्या कथा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(दत्ता टोळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/k9zGEp येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link