Next
नाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण
BOI
Thursday, December 13, 2018 | 04:39 PM
15 0 0
Share this story

नाशिक : ‘एकलहरे येथील ६६० मेगावॅटचा रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचे संकेत ऊर्जा खात्याने दिले असून, गुजरातमधील उकई आणि नागपूरजवळील कोराटी येथील धरतीवर एकलहरे येथील विद्युत प्रकल्प पुन्हा सुरू केला जाणार आहे,’ अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.  

एकलहरे येथील प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक दिवसांपासून बंद होता. हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला, तर नाशिक रोड आणि पंचक्रोशीमध्ये हजारो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार होती; तसेच ते बेघर होण्याचा धोका होता. यामुळे त्यांच्या स्थलांतराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, या सर्व गोष्टींची दखल घेऊन खासदार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांची लढा समिती उभारण्यात आली होती. यात खासदार गोडसे यांनी ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प नाशिकलाच राहावा यासाठी प्रयत्न केले होते.

कामगारांच्या या लढ्याला ऊर्जा खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एकलहरे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे. येत्या दोन महिन्यांत अंतिम निर्णय होऊन एकलहरे वीज केंद्राला उर्जितावस्था मिळण्याचे संकेत ऊर्जा खात्याने दिले आहेत. औष्णिक निर्मिती केंद्राची लवकरच आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करणार असल्याचे ऊर्जा खात्याचे सचिव अरविंद सिंग यांनी खासदार गोडसे यांना सांगितले.

खासदार हेमंत गोडसेचार वर्षांपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, मात्र हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. दोन महिन्यात कोराटे आणि उकई या केंद्रांची परिस्थिती पाहून दोन महिन्यात एकलहरे प्रकल्पाला ऊर्जितावस्था मिळेल, असे ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे एकलहरे आणि पंचक्रोशीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे; तसेच हा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास तीन हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे.

याबाबत खासदार गोडसे म्हणाले, ‘या प्रकल्पाचा पाठपुरावा आम्ही गेली अनेक दिवसांपासून करत होतो. आता ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी याला हिरवा कंदील दाखवल्याने हा प्रकल्प दोन महिन्यांत सुरू होईल, असा अंदाज आहे. तांत्रिक अडचणी वगळता हा प्रकल्प लवकरच सुरू होऊन ६६० मेगावॉट वीज प्रकल्प नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून लवकरच सुरू होईल असे वाटते. यामुळे कामगारांवर येणारे संकट टळणार असून, नाशिकच्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sandip gupta About 97 Days ago
Kam chalu zhal tr samja sanction zhal election aal ki ashe news yenarch aahe pn project BJP nahi det. aashe news khup wela yeun geli aahe. ...
0
0
JAGDISH ISHI About 100 Days ago
660MW एकलहरे येथे होणाऱ्या प्रकल्पामुळे अभिनंदन , पण दोंडाईचा प्रकल्पा चे काय ? उत्तर महाराष्ट्रात ले प्रकल्प दुसऱ्या कडे नेत आहेत .
0
0
Rajendra Lahamge About 100 Days ago
660MW एकलहरे येथे एनकेन प्रकारे सुरु होईलच ही आमची जाहीर अंतरी ईच्छा पूर्ण होताना दिसते. 660MW सुरु होण्यापूर्वी आपला प्राण जाणार नाही याचेही एकलहरेच्या मित्रांना स्मरत असेलच.
0
0
Ashish kapile About 100 Days ago
Khup mast kam kela saheb. Abhari aho amhi. Tumcha abhinandan saheb.
0
0

Select Language
Share Link