Next
लेनदेन क्लबतर्फे ‘इन्स्टामनी’ अँड्रॉईड अॅप सादर
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 01:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : लेनेदेनक्लब या भारतातील जलदगतीने विकसित होत असलेल्या पीअर-टू-पीअर (पी२पी) कर्ज सुविधा देणाऱ्या व्यासपीठाने कर्जदारांना कर्ज देणाऱ्या संस्थांशी जोडण्यासाठी अँड्रॉईड-आधारित ‘इन्स्टामनी’ हे अॅप्लिकेशन सादर केले आहे. 

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून  डाऊनलोड करता येते. या नवीन अॅपसह वापरकर्ते आता त्यांच्या पगारामधील आगाऊ रक्कम आणि त्वरित रोख कर्ज सुलभपणे प्राप्त करू शकतात. अर्जदाराने आपला मासिक पगार किमान १२,००० रुपयांपर्यंत आहे. याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. त्यांचे अर्ज क्रेडिट प्रक्रियेला पाठवण्यासाठी आधार क्रमांक प्रविष्ट करणे गरजेचे आहे.  

लेनदेनक्लबचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, ‘पगारदार व्यक्तींना महिन्यादरम्यान अनपेक्षित खर्चासाठी आवश्यक असलेल्या लहान कर्जाची सुविधा देणे हा ‘इन्स्टामनी’ अॅप सादर करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. एकावेळीच होणाऱ्या खर्चांमुळे पगारदार व्यक्तींना त्वरित गरजांची पूर्तता करण्यामध्ये रक्कमेची कमतरता भासू शकते. याकरिता पूर्वी त्यांना कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांवर अवलंबून राहावे लागत होते. आता ते आमच्या अॅपवर अवलंबून राहू शकतात. याद्वारे कर्जप्रक्रिया फक्त दोन ते तीन तासांमध्ये पूर्ण होते. ही सेवा देशातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील लाखो व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी आहे. या शहरांमध्ये रोजगाराचे प्रमाण अधिक आहे, पण बँकांसारख्या पारंपारिक कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्जसुविधा मिळणे अत्यंत अवघड जाते. त्यांना त्रासदायक प्रक्रियेबाबत चिंता असते किंवा त्यांना पारंपारिक आर्थिक प्रणालीमधून वगळण्यात आलेले असते, म्हणजेच ते कर्ज घेण्यासाठी पात्र नसतात. इन्स्टामनी अॅपच्या माध्यमातून ते आता विनासायास  कर्जसुविधा प्राप्त करू शकतात.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link