Next
प्रा. दिनेश क्षीरसागर ठरले उत्कृष्ट विषय विशेषज्ञ
पणनमंत्र्यांच्या हस्ते गौरव
BOI
Monday, December 24, 2018 | 03:12 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
मोहोळ (जि. सोलापूर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ प्रा. दिनेश क्षीरसागर यांना राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत नुकतेच गौरविण्यात आले. उत्कृष्ट विषय विशेषज्ञ म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रा. क्षीरसागर हे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत आहेत. ते अन्न व प्रक्रिया विभागाची जबाबदारी सांभाळतात. प्रा. क्षीरसागर यांनी आजवर अनेक शेतकरी व महिला बचत गटांना अन्न व प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण दिले आहे. पुरुष व महिला शेतकऱ्यांनी शेतीच्या जोडीला उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. डाळी, डाळिंब, गूळ व ज्वारी अशा अनेक कृषिमालासंदर्भातील उद्योगांसंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळेच शासनाच्या आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार व प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. 

त्यांना ‘आत्मा’अंतर्गत उत्कृष्ट विषय विशेषज्ञ म्हणून पुरस्कार देण्यात आला. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या सेंद्रिय शेती मेळाव्याच्या कार्यक्रमात त्यांना सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ काजल जाधव, प्रा. किरण जाधव, प्रा. अजय दिघे, तुषार अहिरे, सुयोग ठाकरे, नरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर तांदळे, संजय बनसोडे, नितीन बागल, शंकर सुतार, अरुण गांगोडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search