Next
महामानव + निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो
BOI
Saturday, April 14, 2018 | 11:03 AM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नव्या पिढ्यांना समजावे आणि त्यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन नवा भारत घडविण्यासाठी काम करावे, या उद्देशातून निर्माण झालेल्या साहित्यात प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या या दोन्ही पुस्तकांची नोंद घ्यावी लागेल.

डॉ. आंबेडकर यांचे स्वयंकथन ‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ हे लेखन रसात्मक पद्धतीने केले आहे. त्यांच्या बालपणापासूनचे अनुभव, संकटे, आव्हाने यांच्याशी जिद्दीने, धाडसाने केलेला सामना, त्यांची वैचारिक जडणघडण आदींची झलक त्यातून दिसते.

सोनोग्रा यांचे दुसरे ‘महामानव’ हे पुस्तक म्हणजे चित्रनाट्य कथा आहे. छोट्या छोट्या प्रसंगामधून उलघडत जाणारे बाबासाहेबांचे हे छोटेखानी चरित्रच आहे. ‘आज मी देशाच्या घटनेत अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली. आज मला आनंदाने जाहीर करावे वाटते.......’ अशी पल्लेदार स्वगते ही या पुस्तकाचा आत्मा आहेत.

प्रकाशक : स्नेहबंध प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link