Next
तरुणांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, June 28 | 11:09 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे तरुणांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १६ वर्षांवरील मुलांना अभिनय, दिग्दर्शन, लेखन, रंगमंच व्यवस्थापनाबरोबरच तांत्रिक बाजूंचे देखील प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. १ जुलै ते २६ ऑगस्टदरम्यानच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार ही कार्यशाळा होणार असून, कार्यशाळेचा समारोप सहभागी कलाकारांच्या नाट्यप्रयोग सादरीकरणाने होईल,’ अशी माहिती अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली आहे.

लहानपणीच मुलांमध्ये नाट्यशास्त्र रुजावे, कळावे यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके काम करत आहे. ‘भालबा केळकर करंडक’, ‘दिवाकर स्मृती नाट्यछटा’ अशा बालनाट्यविश्वातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या स्पर्धांचे आयोजन अकादमीमार्फत गेली अनेक दशके करण्यात येत आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन याबरोबर अकादमीतर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिरे ही घेण्यात येतात.

सहभागी होण्यासाठी संपर्क : धनंजय कुलकर्णी- ७५८८२ ३५८२५, (०२०) २४४७ ८२६८  
वेबसाइट : www.natyasanskar.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link