Next
‘निवडलेल्या क्षेत्रात युवतींनी सर्वोत्तम बनावे’
प्रेस रिलीज
Monday, December 17, 2018 | 02:30 PM
15 0 0
Share this article:कबनूर (इचलकरंजी) : ‘युवतींनी शिक्षणाबरोबरच स्वतःतील इतर कलागुण विकसित करण्यावर भर द्यावा. स्वतःमधील क्षमता सिद्ध करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात सर्वोत्तम बनावे,’ असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी केले.

वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन समाज आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने इचलकरंजी तालुक्यातील कबनूर येथे युवती सक्षमीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

मुख्य प्रशिक्षक दीपक पाटील यांनी युवतींना मार्गदर्शन केले. युवतींनी आई-वडिलांबरोबर संवाद कसा साधावा, चांगल्या मित्रांची निवड, स्वताचे संरक्षण, वैवाहिक जीवनाचा निर्णय, सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाइल यांच्या दुष्परिणामांपासून कसे वाचावे, आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान कशा पद्धतीने टिकवून ठेवावा आदींबाबत मागदर्शन केले. या शिबिरासाठी पाटील यांच्यासोबत डॉ. संतोष पाटील, सीमा शिंदे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. या शिबिरात १२६ युवती सहभाही झाल्या होत्या. या वेळी ऋषभ छाजेड, अनिल गडकरी, पारस वागोनी, हुव्वाण्णा मजलेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

शिबिराचे उद्घाटन वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया पाटील, उपाध्यक्षा सुनिता खंजिरे, सचिव सुवर्णा हुल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रांतीय प्रमुख अजित पाटील, संघटक सुरेश मालगावे, राजू मालगावे कागल प्रमुख सुरज चौगुले, जलद पाटील, शीतल पाटील, संजय केटकाळे, महावीर लिगाडे, भाऊसो केटकाळे, बाळासो मगदूम, राजेंद्र काडाप्पा, मिलिंद मगदूम, उर्मिला खोत, संगीता पाटील, सरिता कोले, शांता कोले आदी उपस्थित होत्या.

प्रांतीय सचिव विजय बरगाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण शिरगुप्पे यांनी स्वागत केले. हेमंत देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सदस्य सचिन पाटील, संघनायिका स्वाती कोले, उपसंघनायिका मनीषा काडाप्पा, सीमा लिगाडे, संघनायक सुजन शिरगुप्पे, कमिटी अध्यक्ष संजय लिगाडे, सुषमा कोले, मंगल पाटील, सुषमा झोले, स्वाती काडाप्पा, सुरेखा गेविशे, अंजली काडाप्पा, सरोज केटकाळे, वैभव कोले, प्रज्वल मगदूम प्रजोत पाटील, उपसंघनायक मिलिंद मगदूम, दीपक मगदूम यांनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search