Next
शमा भाटे यांची २६ एप्रिलला प्रकट मुलाखत
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कथ्थकमधील नृत्य संरचनांचा प्रवास’ (कोरिओग्राफी- काल, आज, उद्या) या विषयावर नृत्य गुरू शमा भाटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम २६ एप्रिल २०१९ रोजी आयोजित केल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे हा कार्यक्रम सादर केला जाणार असून, जयश्री बोकील आणि लीना केतकर या भाटे यांची मुलाखत घेतील. हा कार्यक्रम २६ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होईल. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७५वा कार्यक्रम असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search