Next
राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेविषयी मागर्दर्शन शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, August 23, 2017 | 06:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : केंद्र शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेविषयी जनसामान्यांना तसेच उद्योगजगतातील प्रतिनिधींना सविस्तर माहिती व्हावी या हेतूने नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमचा  पुणे विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे मार्गदशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत युवक युवतींना प्रत्यक्ष औद्योगिक कंपनीमध्ये ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ घेण्याचीसंधी उपलब्ध होते. तसेच दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन स्वरूपात प्राप्त होते. या विद्यावेतनातील रक्कमेच्या २५ % भार सरकार उचलते. विशेष बाब म्हणजे आताही  योजना उत्पादन, विक्री, सेवा आणि अन्य क्षेत्रातील आस्थापनांनाही  लागू असणार आहे.
 
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उद्योग जगतामध्ये या योजनेची माहिती व्हावी. तसेच या योजनेची कार्यपद्धती, नियम आदी बाबी  सविस्तरपणे माहित व्हाव्यात, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या  व  एनआयपीएम पुणे यांच्या पुढाकाराने हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तरी या मार्गदर्शन शिबिराला विविध औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एनआयपीएम पुणेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व चंद्रकांत निनाळे, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, पुणे यांनी केले आहे.
 
हे मार्गदर्शन शिबिर विनामूल्य आहे.   

दिवस : २४ ऑगस्ट

वेळ  : संध्याकाळी ६.३० वाजता

स्थळ : सुमंत मुळगावकर सभागृह, ए विंग, एमसीसीसीआयए, आयसीसी टॉवर, सेनापती बापट रोड, पुणे.
 
नावनोंदणीसाठी संपर्क  :  ७३५०० १४५२८/ ७३५०० १४५३३/३६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yogesh Rangnekar About
Great. Nice Programme
0
0

Select Language
Share Link
 
Search