Next
झिम्बाब्वेतील वादळग्रस्तांना पुणेकर रोटेरियनची मदत
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 03:50 PM
15 0 0
Share this article:


पुणे : झिम्बाब्वेमध्ये मार्च महिन्यात झालेल्या इडाई या वादळ-पाऊस-पूर संकटात बेघर झालेल्या नागरिकांना पुणेकर रोटेरियन राहुल पाठक यांनी चार वॉटर फिल्टरची मदत केली आहे. ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ आणि ‘युनायटेड नेशन झिम्बाब्वे ग्रुप’ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाठक यांनी ही मदत केली आहे.   

झिम्बाब्वेमध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या इडाई या वादळ-पाऊस-पूर संकटात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले. हजारो लोक बेघर झाले. दोन लाख लोकांसह पिके आणि जनावरांनाही वादळाचा फटका बसला. ‘युनायटेड नेशन झिम्बाब्वे ग्रुप’ या नावाने भारतातील व इतर देशांतील हितचिंतकांचा एक समूह कार्यरत आहे. त्या ग्रुपमधे पुण्यातून रईसा शेख, सतीश खाडे हे सदस्य कार्यरत आहेत. सतीश खाडे यांनी रोटरी परिवारात आवाहन केल्यानंतर ‘रोटरी क्लब कोथरूड’चे राहुल पाठक यांनी त्यांच्या ‘अॅक्वा प्लस’ या कंपनीमार्फत ताबडतोब चार मोठे वॉटर फिल्टर झिम्बाब्वे येथे मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रकाच्या औपचारिकता पूर्ण करत हे चार वॉटर फिल्टर घेऊन स्वतः रोटेरियन राहुल पाठक आपल्या सहकाऱ्यांसोबत  झिम्बाब्वेत दाखल झाले आणि तेथे हे वॉटर फिल्टर बसविले. 


‘अॅक्वा प्लस’ ही कंपनी पुण्यातील असून पूर, वादळ, भूकंप अशा आपत्कालीनवेळी शुद्ध आणि संरक्षित पाणी देण्यासाठी वॉटर फिल्टरसारखी विविध उपकरणे बनवते. अशा उपकरणांमध्ये वीज वा इतर ऊर्जा लागत नाही. या वॉटर हजारो लोकांना आता वादळ व पुरानंतर येणाऱ्या रोगराईवेळी दूषित पाणी मिळण्याऐवजी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. 

राहुल पाठक व त्यांच्या कंपनीने केरळमध्ये आलेल्या पुराच्यावेळीही तीनच दिवसांत अनेक वॉटर फिल्टर्स उभारून हजारो लोकांना साथीच्या रोगापासून वाचवले होते. ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’चा पाणीविषयक उपक्रम फक्त पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या पलीकडे पोहचला आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे रोटरीचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search