Next
कोलगेट भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रँड
प्रेस रिलीज
Tuesday, February 20 | 05:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड या ओरल केअर क्षेत्रातील अग्रेसर कंपनीला भारतातील सर्वांत विश्वसनीय ब्रँड्स २०१७ या सर्वेक्षणात प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला असून, हे सर्वेक्षण नेल्सनतर्फे आयोजित करण्यात आले होते. याचे परिचालन ब्रँड इक्विटीतर्फे करण्यात आले.

कोलगेट या ब्रँडला सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वांत विश्वसनीय ब्रँडचे स्थान लाभले असून, इतकी वर्षे आपले स्थान सातत्यपूर्ण रितीने टिकवून ठेवणारा हा एकमेव ब्रँड आहे.

याबाबत बोलताना कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बचालानी म्हणाले, ‘कोलगेटवर दररोज विश्वास ठेवल्याबद्दल आमच्या सर्व ग्राहकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. भारताला सतत हसवत ठेवण्यासाठी आमच्या विश्वासार्हतेचीच आम्हाला मदत झाली आहे. आता जवळजवळ ८० वर्षे, कोलगेट हा ब्रँड भारतातील मौखिक आरोग्यासाठी जागरुकता निर्माण करीत आहे. प्रत्येकाला एक हसरा भविष्यकाळ मिळवण्याचा हक्क आहे, हेच यामागचे तत्व आहे.’

सर्वेक्षणाविषयी...

२०१७ मधील सर्वांत विश्वसनीय ब्रँड्सच्या सर्वेक्षणासाठी विविध ब्रँड्स व कॅटेगरींची निवड करताना पहिल्या टप्प्यात, त्या-त्या ब्रँड्सची विक्री, त्यांची सामाजिक पत आणि प्रसारमाध्यमांतील डेटा यांचा सखोल अभ्यास व त्याविषयी चर्चा करण्यात आली. ब्रँड इक्विटी टीम आणि नेल्सनची संशोधन टीम यांच्यात सखोल चर्चा झाल्यानंतर या सर्वेक्षणासाठी ब्रँड्सची यादी आणि कॅटेगरींची निवड करण्यात आली. यंदा, या सर्वेक्षणात खाद्यसेवा या नवीन कॅटेगरीची ब्रँड यादीत भर घालण्यात आली.

यंदाच्या सर्वेक्षणात भारतातील विविध शहरांतल्या सहा हजार ५९ ब्रँड्सपैकी ३४२ ब्रँड्सचा अंतिम सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. यात बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, भूवनेश्वर, चंदीगड, इंदूर, लखनऊ, पटणा आणि विजयवाडा या शहरांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link