Next
‘अखिल वनाज’तर्फे मुलांना खाऊ वाटप
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 02:46 PM
15 0 0
Share this storyपुणे : अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील पूना स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्समधील अंध मुलींना आणि कात्रज येथील ममता फाउंडेशन येथे एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे, चॉकलेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

‘या कार्यक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष होते. समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रस्ट ला वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. या मुलांना मिळालेले फुगे आणि खाऊ यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ट्रस्ट ला आनंदित करतो,’ अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि आयोजक गिरीश गुरनानी यांनी दिली.

या वेळी अमोल गायकवाड, संदेश कोतकर, गोविंद गुप्ता, विनायक वरपे, उमेश गीरासे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link