Next
‘एएलपी’तर्फे मुलाखत सत्राचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 04:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : असोसिएशन ऑफ लँग्वेज प्रोफेशनल्स (एएलपी) आणि सिम्बॉयसिस संस्थेचे ‘एसआयएफआयएल’ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९:३० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या बडोद्याचे विक्रांत पांडे आणि पुण्याच्या लीना सोहोनी या प्रख्यात भाषांतरकारांचे मार्गदर्शन या सत्रात लाभ​​णार आहे.

‘एएलपी’द्वारे विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ही संस्था भारतीय व परकीय भाषा व्यावसायिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. दोन्ही भाषांतरकारांना प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या सत्रासाठी प्रवेशमूल्य नाही.  

‘एसआयएफआयएल’ या संस्थेतर्फे परकीय भाषेचे वर्ग घेतले जातात व अभ्यासक्रमविषयक तसेच सांस्कृतिक, व्यवसायमार्गदर्शनपर कार्यक्रम व परिसंवाद यांचे आयोजन केले जाते. ‘एसआयएफआयएल’चा परकीय भाषेतील चित्रपट दाखवणारा मुव्ही क्लबदेखील आहे.

मुलाखत सत्राविषयी :
दिवस : २९ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी ९:३० ते दुपारी १२
स्थळ : सिंबायोसिस संस्थेचे एसआयएफआयएल सभागृह, प्लॉट नं. ४१९, मॉडेल कॉलनी, गोखले क्रॉस रोड, पुणे.
नोंदणीसाठी संपर्क : केतकी नवाथे- ९८२२० ४००४८, ललिता मराठे- ९९२१३ ५४१७१.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link