Next
श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आर्थिक मदत
BOI
Friday, January 25, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this story

श्री साई नागरी सहकारी पतसंस्था व साई एसके ग्रुप यांच्यातर्फे आभाळमाया संस्थेच्या मुलींना धान्य व कपडे वाटप करताना कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल व संस्थेचे चेअरमन श्रीनिवास काबरा.

पुणे : श्री साई नागरी सहकारी पतसंस्था व साई एसके ग्रुप यांच्यातर्फे पुणे जिल्ह्यातील अपंग विकास मंचास एक लाख रुपयांचा धनादेश आणि कपडे; तसेच पाचाणे गावातील आभाळमाया संस्थेच्या सर्व अनाथ व गरजू मुलींना धान्यवाटप व कपडे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. जयश्री फडणवीस, कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ समाजसेविका तथा आभाळमाया संस्थेच्या संचालिका शांताबाई येवले आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी  बाळकिसनजी बजाज, श्रीकांत लखोटीया, महेश बँकेचे संचालक अनिल राठी, अॅड. जगदीश कचोलिया, रमेश जाजू, विजया लढ्ढा, शकुंतला सोनी, श्रीनिवास करवा, डॉ. शाळीग्राम भंडारी, सुरेश भट्टड, सुभाष भट्टड, जयेश कासट, राजा धीरुभाई, संस्थेचे चेअरमन  श्रीनिवास काबरा, व्हाईस चेअरमन जगदीश अग्रवाल, संचालक सुरेशचंद्र नावंदर, सुनील सोमाणी, रमेश लाहोटी, सपना सोमाणी, सचिन अग्रवाल, सचिव कविता भुतडा, व्यवस्थापक संजय लढ्ढा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी महिलांसाठी तिळगुळ, हळदीकुंकू तथा ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात विजेत्या महिलांना पैठणी, तसेच भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ व्दारे सोन्याची नथ व चांदीचा शिक्का आणि ११० आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. 

या वेळी संस्थेचे चेअरमन श्रीनिवास काबरा म्हणाले, ‘ आमच्या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या वर्षी संस्थेतर्फे राष्ट्रीय अपंग विकास मंचास एक लाख रुपये  तसेच पाचाणे येथील आभाळमाया संस्थेच्या सर्व अनाथ व गरजू मुलींना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहूनच आम्हाला समाधान वाटले. यापुढेही संस्था गरजूंना मदत करीत राहील.’ 

‘आमची संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवते. ज्यामध्ये गरजूंना मोफत औषधे, तसेच दर गुरुवारी औषध उपचारासाठी येणाऱ्या गरजवंतांना पोळीभाजीचे डबे देण्यात येतात. यापुढेही संस्था असे अनेक उपक्रम करत राहील,’ असा विश्वास पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय लढ्ढा यांनी या वेळी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link