Next
‘गोलमाल ज्युनिअर’ गँग करणार सुट्टीची मजा डबल
अॅनिमेशन सीरिजमध्ये येणार ‘गोलमाल’
BOI
Friday, April 19, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : माधव, लकी, लक्ष्मण, गोपाल ही ‘गोलमाल’ या बॉलीवूड चित्रपटातील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी पात्रे आता अॅनिमेशन स्वरूपात येऊन बच्चेकंपनीला हसवण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘निकलोडियन’ या भारतातील लहान मुलांसाठीच्या प्रसिद्ध वाहिनीने गोलमालची अॅनिमेशन सीरिज करण्याचे ठरवले असून लवकरच ती मुलांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोलमाल’ चित्रपट आणि त्याचे इतर भाग यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू या अभिनेत्यांनी यातील पात्रे साकारली होती. या विनोदाने भरलेल्या चित्रपटांची अॅनिमेशन सीरिज सुरू करण्याचे निश्चित केल्यानंतर निकलोडियन वाहिनीने त्यावर काम सुरू केले आहे. 

दोन मस्तीखोर गँग्सना एकत्र आणणारे हे ‘गोलमाल ज्युनिअर’ असणार आहे. यात गोपाल, माधव, लक्ष्मण, लकी यांचे ज्युनिअर्स पाहायला मिळणार आहेत. ही ज्युनिअर गँग बच्चेकंपनीला नक्कीच आवडेल अशा विश्वास वाहिनीने व्यक्त केला आहे. 

दरम्यान ‘मॅजिक टून’, ‘रुद्रा’ यांसारख्या मनोरंजक, विनोदी आणि धमाल शोनंतर आता निकलोडियन वाहिनी या गोलमाल ज्युनिअर्सच्या अॅनिमेशन सीरिजसोबत पुन्हा एकदा आपले भरपूर मनोरंजनाचे वचन पूर्ण केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search