Next
विवोचा नवा स्मार्टफोन ‘व्ही९’ सादर
प्रेस रिलीज
Monday, March 26, 2018 | 03:25 PM
15 0 0
Share this story

‘व्ही९’  नवीन स्मार्टफोन सादर करताना ‘व्हिवो इंडिया’चे सीईओ केन्ट चेन्ग
पुणे : स्मार्टफोनच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरील सर्वोत्तम ब्रॅण्ड्समध्ये गणल्या जाणाऱ्या व्हिवोने ‘व्ही९’हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे.  

याबाबत अधिक माहिती देताना ‘व्हिवो इंडिया’चे सीईओ केन्ट चेन्ग म्हणाले, ‘ड्युएल रिअर कॅमेरा असलेला हा कंपनीचा भारतातील पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. दोन  एप्रिलपासून तो सर्व ऑफलाइन दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असून त्याआधी सर्व किरकोळ विक्री दुकानांत, व्हिवो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलवर त्याचे  प्री-बुकिंगही करता येणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल क्षमतेचे दुहेरी रिअर कॅमेरे आहेत. खास तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून या फोनची रचना करण्यात आली असून यात अभिजात बाह्यरूप आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये यांचा मिलाफ आहे.’ 

‘याची किंमत २२ हजार ९९० रुपये असून शँपेन गोल्ड आणि पर्ल ब्लॅक अशा दोन रंगांत तो उपलब्ध आहे.नाविन्यपूर्णता आणि दर्जा या दोन्ही आघाड्यांवर उच्च प्रतीचे परिणाम देणारे आहे. आमचे हे नवीनतम फ्लॅगशिप उत्पादन या उद्योगक्षेत्रातील सर्व मैलाचे टप्पे पार करेल आणि बाजारपेठेतील आमच्या अग्रस्थानावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास आम्हाला वाटतो.’ असेही त्यांनी सांगितले.

'छोट्या पॅकेजमध्ये मोठी स्क्रीन यातील फुल व्ह्यू डिस्प्ले २.०  हे वैशिष्ट्य आणि पाहताक्षणी छाप पाडणारे ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी प्रमाण या दोहोंमुळे या फोनची रचना लक्षवेधी ठरली आहे. या स्मार्टफोनमधील बेझेल्स अर्थात स्क्रीनच्या चौकटीची जागा अगदी कमीतकमी म्हणजे जेमतेम १.७५ मिमी इतकीच ठेवण्यात आली आहे त्यामुळे  हा ५.५ मिमी आकाराचा पारंपरिक स्मार्टफोन या दृष्टीने आटोपशीर असला तरीही त्याला विस्तृत डिस्प्ले लाभला आहे. यातील ड्युएल रिअर कॅमेरा छायाचित्रणाचा अद्वितीय असा अनुभव देतो. यातील मागच्या कॅमेऱ्यातील यंत्रणा बोकेह मोडसोबतच अधिक प्रकाशमान आणि अधिक सुस्पष्ट फोटो घेण्याची मुभा देते. कमी प्रकाशातही उत्तम दर्जाची छायाचित्रे मिळतात. याखेरीज या रिअर कॅमेऱ्यामध्ये आणखीही अनेक वैशिष्ट्ये आहेत.उच्च क्षमतेच्या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये जेंडर डिटेक्शन, स्टिकर्स, फेस ब्युटी व्हीडिओ कॉल, कॅमेरा फिल्टर, एचडीआर आणि पोट्रेट लायटिंग इफेक्ट आहे. सगळ्या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना सेल्फी काढताना नवनवे प्रयोग करून पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळते. यातील स्मार्ट इंजिनमुळे (कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी प्रणाली) हा फोन आपल्या मालकांच्या सवयी आणि पसंतीची नोंद ठेवतो जेणेकरून स्मार्टफोनची सर्वोत्कृष्ट कामगिरी अनुभवता येते. यातील अटेन्शन सेन्सिंगची सुविधा फोनचा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेते. त्यासाठी मेसेज अॅलर्ट्सचा, फोनकॉल्स आणि अलार्म्सचा आवाज कमी करण्यासारखी कामे ती स्वत:च पार पाडते', अशी माहितीही त्यांनी दिली.

'या फोनमधील नवा ‘गेम मोड’ गेमिंगच्या चाहत्यांना अधिक सुधारित अनुभव देतो. या मोडमध्ये गेम चालू असताना मेसेज, कॉल्स, अॅलर्ट्स यांचा अडथळा येऊ शकत नाही आणि गेम विनाव्यत्यय चालू राहतो. किंवा केवळ ठराविक कॉन्टॅक्ट्सवरून येणारे फोनकॉल्स दिसतील आणि स्क्रीन स्वाइप करून असे कॉल्स सहज घेता येईल अशी सोयही यात करता येते. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२६  ऑक्टा कोअर प्रोसेसर बसविलेला असून त्याला ३२६० एमएएच  बॅटरीची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करणे किंवा अखंड गेम्स खेळणे या गोष्टी अधिक काळ करता येतात. हा स्मार्टफोन २३ मार्चपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला असून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल आणि व्हिवोचे अधिकृत ई-स्टोअर (http://shop.vivo.com/in/) अशा भारतातील सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर या फोनच्या नोंदणीवर काही आकर्षक ऑफर्सही देऊ करण्यात आल्या आहेत. अॅ्मेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल आणि व्हिवोचे अधिकृत ई-स्टोअर या ठिकाणांवरून २३ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत या फोनचे प्री-बुकिंग करणारे ग्राहक या फोनच्या डिस्प्लेची अपघाताने मोडतोड झाल्यास एकदा स्क्रीन बदलून मिळण्यास पात्र ठरणार आहेत. याखेरीज जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना दोन हजार रुपयांची सूटही मिळणार आहे. हा फोन ईएमआयवर खरेदी करणाऱ्यासाठी सहयोगी ई-कॉमर्स मंचांकडून १२ महिन्यांपर्यंत बिनव्याजी ईएमआयची सोयही दिली जाणार आहे', असे ही केन्ट चेन्ग म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link