Next
‘स्वरपुष्पार्पण’ द्वारे पं. नारायणराव बोडस यांना स्वरांजली
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this story

आग्रा घराण्याच्या लीला नरवणे  गायन सादर करताना
पुणे : ग्वाल्हेर -आग्रा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक व अनेक अनवट राग लीलया गाणारे पं. नारायणराव बोडस यांना त्यांचे शिष्य व कलाकारांनी स्वरांजली अर्पण केली. निमित्त होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘स्वरपुष्पार्पण’ या कार्यक्रमाचे.

शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जयपूर घराण्याच्या गीता गुलवाडी यांनी गायन, धृपद- धमार मधील डागुरबानी घराण्याचे उस्ताद बहाऊद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन, लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती यांचे कथक, आग्रा घराण्याच्या लीला नरवणे यांचे गायन, ग्वाल्हेर- आग्रा -जयपूर- भेंडीबाजार घराण्याचे गायक व पं नारायणराव बोडस यांचे पुत्र पं. केदार बोडसयांचे गायन, डागुरबानी घराण्याचे पं. पुष्पराज कोष्टी यांचे सूरबहार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

प्रसिद्ध धृपद गायक पं. उदय भवाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी गीता गुलवाडी यांनी ‘धन धन भाग साजनी... ‘या विलंबित तीन तालातील रचनेने आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मधुकंस रागातील तीन तालात जगदंब अंबे भवानी... ही लक्ष्मणराज बोडस यांची बंदिश सादर केली. धृत एक तालातील तराण्याने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. यानंतर उस्ताद बहाऊद्दिन डागर यांनी राग पूर्वामध्ये रुद्रवीणा सादरीकरण केले. लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती यांनी यावेळी राग सरगम सादर केला. त्यानंतर त्यांनी गणेशवंदना, ताल धमार, बिंदादिल महाराजांची आवत शाम... ही ठुमरी सादर केली. धृत तीन ताल मधील रचनेने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. लीला नरवणे यांनी राग बागेश्री सादर करीत उपस्थितांना मंत्रमुद्घ केले. केदार बोडस यांनी राग केदार सादर केला तर पं. पुष्पराज कोष्टी यांनी राग झिंझोटीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप केला.   
           
या वेळी या सर्व कलाकारांना दत्तात्रय भावे, प्रदीप सरदेसाई, श्रीपाद गोडसे (तबला), सुखद मुंडे (पखावज),  संजय गोगटे, लीलाधार चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), सतविंदर पाल सिंग (सारंगी), केदार केरुलकर (गायन) , रसिका भावे (पढंत), नितीश पुरोहित (सरोद), अझरूद्दीन शेख (बासरी), प्रणय सकपाळ (मंजिरा) हे साथसंगत केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link