Next
‘खुद्दाम-ए-हुजाज’तर्फे हज यात्रा मार्गदर्शन शिबिर
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘खुद्दाम-ए-हुजाज’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय हज यात्रा पुणे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिरात दीड हजार यात्रेकरूंनी सहभाग घेतला. आझम कॅम्पस येथे २२ व २३ जून २०१९ रोजी हे शिबिर झाले. हज यात्रेचा प्रवास, नियम, धार्मिक विधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


गेली १२ वर्षे ‘खुद्दाम-ए-हुजाज’तर्फे हजयात्रेकरूंना अर्ज भरण्यापासून ते विमानात बसेपर्यंतच्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश हज कमिटीच्या अधीन राहून केले जात असून, प्रशिक्षणही दिले जात आहे. शिबिराचे उद्घाटन २२ जून रोजी ऑल इंडिया हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मकसूद खान यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ‘खुद्दाम-ए-हुजाज’चे अध्यक्ष सय्यद रियाझ काझी, सरचिटणीस भाईजान काझी, डॉ. पी. ए. इनामदार, मुनवर पिरभॉय व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिराचा समारोप रविवारी झाला. सय्यद मुनाफ, मुन्ना शेख, इद्रीस मेमन खालू, मेहबूब शेख, उस्मान शेख मन्सूर काझी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search