Next
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत कीर्तन जुगलबंदी
BOI
Tuesday, August 13, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

कीर्तनकार दाम्पत्य - श्रेयस आणि मानसी बडवेरत्नागिरी : १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री रत्नागिरीत ‘कथा स्वातंत्र्याची.. गाथा बलिदानाची..!’ हा कीर्तन जुगलबंदीचा कार्यक्रम रंगणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व सौ. मानसी बडवे हेच कीर्तनकार दाम्पत्य या वर्षीही कीर्तन जुगलबंदी सादर करणार आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या आयुष्याचे योगदान देणाऱ्या, जिवाचीही पर्वा न करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे, स्वातंत्र्यसेनानींचे, क्रांतिकारकांचे स्मरण करणे  व त्यांच्या हौतात्म्याचे, बलिदानाचे जाहीर अभिवादन करणे या हेतूने रत्नागिरीत २०१८पासून ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. संवेदनशील रत्नागिरीकरांनी या उपक्रमाला मनापासून प्रतिसाद दिला.  

‘कथा स्वातंत्र्याची.. गाथा बलिदानाची..!’ हा यंदाच्या कीर्तन जुगलबंदीचा विषय आहे. वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या लढाईत अनेक स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही तितक्याच सक्षमपणे सहभागी झाल्या. त्यांनी कधी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर कधी अप्रत्यक्ष, पण समर्थपणे पाठिंबा दिला. आपल्या देशासाठी अनेक स्त्री-पुरुषांनी दिलेल्या बलिदानाची गाथा या कीर्तनाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. 

या कीर्तन जुगलबंदीला रत्नागिरीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांनी केले आहे.

कीर्तन जुगलबंदी 
दिवस : १४ ऑगस्ट २०१९
वेळ : रात्री १० वाजता
स्थळ : पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह (संघ कार्यालय), माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका, रत्नागिरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 12 Days ago
Entertainment put to good use .
0
0

Select Language
Share Link
 
Search