Next
ह्युवेईची उल्लेखनीय कामगिरी
प्रेस रिलीज
Wednesday, May 09 | 04:57 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ह्युवेईने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये लक्षणीय कामगिरी बजावली असून, कंपनीचा विविध देशांमधील बाजारपेठ हिस्सा वाढला आहे. कंपनीचा वार्षिक महसूल २०१६च्या तुलनेत १५.७  टक्क्यांनी वाढून ६०३ बिलियन सीएनवाय पर्यंत पोहोचला आहे.निव्वळ लाभ २८.१ टक्क्याने वाढून, ४७.५ बिलियन सीएनवाय म्हणजेच ७.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेला आहे. 

ह्युवेईने २०१७मध्ये एकूण १५ कोटी ३० लाख स्मार्टफोनची विक्री केली. ह्युवेई व ऑनर या दोन्ही ब्रॅंडसनी एकत्र येत नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये व उच्च दर्जाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापक ग्राहक सेवा आणि स्टायलिश नवीन तंत्रज्ञान यांच्या आधारे तरुण पिढीला आकर्षून घेणारा एकमेव ऑनलाइन मोबाइल ब्रॅंड बनण्याचा प्रयत्न केला आहे. ह्युवेईची ह्युवेई पी व मेट सीरीज जगभरातील ग्राहकांच्या पसंतीची ठरली. त्यांनी एकूण दोन कोटी युनिट्सचा टप्पा पार केला. नोवा सीरीज व ऑनरच्या प्रमुख ड्युअल सीरीजने (व्ही व प्रमुख डिजिटल सीरीज) तंत्रज्ञान व आवाजाच्या संयोजनासह आपली उपस्थिती अधिक प्रबळ केली. उत्तम कामगिरी व वाजवी दर यामुळे  विक्रीला खूपच गती मिळाली. २०१७ मध्ये ह्युवेई व ऑनर स्मार्टफोन्सने जगभरात दहा टक्के बाजारपेठ हिस्सा काबीज केला असून, जगातील अव्वल तीन फोन उत्पादक कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे. 

ह्युवेई (ऑनरसह)ने चीनमधील स्मार्टफोन बाजारपेठेत सर्वाधिक हिस्सा मिळवला आहे. युरोपमध्ये ह्युवेईला जर्मनी, फिनलँड, डेन्मार्क, स्पेन व इटलीसारख्या देशांमधील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. या देशांमध्ये ह्युवेई हा दुसरा सर्वात प्रशंसनीय ब्रॅंड ठरला. आशिया पॅसिफिकमध्ये ह्युवेईचा जपान, मलेशिया व थायलंड या बाजारपेठांमधील हिस्साही वाढला आहे. जपानसारख्या देशांमध्ये ब्रॅंडला दुप्पट पसंती मिळाली. लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व व आफ्रिकेमध्ये ह्युवेईच्या स्मार्टफोन व्यवसायाने चांगली वाढ नोंदवली, तर युएई, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको व कोलंबिया अशा प्रमुख देशांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळवला आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link