Next
गणेशवाडीत बालविकास शिबीर उत्साहात
BOI
Friday, November 03 | 02:11 PM
15 0 0
Share this story

कसबा बीड (कोल्हापूर) : गणेशवाडी (ता. करवीर) येथे आम्ही गणेशवाडीकर या मित्रपरिवारातर्फे एकदिवसीय बालविकास शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात ज्येष्ठ बालसाहित्यिक प्रा. टी. आर. गुरव, प्रसारमाध्यम तज्ञ व बालसाहित्यिक गोविंद गोडबोले, नाटककार संजय हळदीकर, रंगरेषा संवादक मिलिंद यादव, चित्रपट गीतकार बी. अनिल व एसपी सुहास खुडे यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरात गणेशवाडी आणि परिसरातील सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. भिंतीबाहेरील जग, खेळ, मुक्तसंवाद, गप्पा-चर्चा, बालसाहित्य वाचन, कथाकथन यांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिबिरातील विद्यार्थ्यांकडूनच करण्यात आले. समारोपाचा समारंभ भारतमातेचा नकाशा रेखाटून त्यासभोवती विद्यार्थ्यांमार्फतच दीपप्रज्वलन व पुष्परचना करून करण्यात आला.

प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण यांनी या शिबिराचे आयोजन केले. यात विक्रम नरके, प्रितेश माने, प्रदीप माने, श्रीरंग माने, नवनाथ माने, कृष्णात माने, सागर माने व अरूण लाड यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link