Next
गीत-नृत्य-रंगांच्या आविष्कारात विठ्ठल साकारला
BOI
Wednesday, July 25 | 01:02 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : ‘स्वराभिषेक’च्या मुलांनी सादर केलेली एकापेक्षा एक समधुर भक्तिगीते, या गीतांना ‘साईश्री’च्या विद्यार्थ्यांनी चढवलेली नृत्याची साज आणि साथीला मधुरा लाकडे यांच्या कुंचल्यातून साकारलेला साक्षात श्री विठोबा यामुळे आषाढी एकादशीच्या रत्नागिरी भक्तीत न्हाऊन निघाली.

बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्ट्स अॅकॅडमी यांच्या सहकार्याने आणि स्वराभिषेक व साईश्री नृत्यवर्ग यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘विठू पंढरी पाहिला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आज पाहिला विठू पंढरी पाहिला’ या गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमाचा ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ या भैरवीने कळस गाठला आणि ‘विठू रत्नागिरी पाहिला’ अशी भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.

शहरातील जयेश मंगल पार्कच्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमात स्वराभिषेक संगीतवर्गाचे शिष्य ईशानी पाटणकर, चैतन्य परब, सिद्धी शिंदे, रागिणी बाणे, तन्वी मोरे, आदित्य पंडित, मीरा सोवनी यांनी ‘सुखाचे ते सुखाचे ते सुख’, ‘जणू देह ही पंढरी’, ‘नामाचा गजर’, ‘नाम तुझे घेता देवा’, ‘नामे विठोबाला पाहू’, ‘जगी जीवनाचे सार’, ‘आली कुठूनशी कानी’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ अशी एकाहून एक सुमधुर गीते सादर केली. विनया परब यांनी त्याचे संगीतसंयोजन केले होते.

‘स्वराभिषेक’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या गीतांवर साईश्री नृत्यावर्गाच्या मिताली भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवी पवार, शिवानी केळकर, केतकी गुणे, तन्वी जोग, सोहिनी जोगळेकर, कश्मिरा तावडे यांनी भरतनाट्यमचा उत्कृष्ट आविष्कार केला. सोबत मधुरा लाकडे यांनी कॅनव्हासवर विठ्ठलाची सुंदर प्रतिमा साकारली. त्यामुळे गीत-नृत्य आणि रंगाचा एक अनोखा आविष्कार रसिकांनी अनुभवला.

या गीतांना महेश दामले (हार्मोनियम), मंगेश चव्हाण (पखवाज), केदार लिंगायत (तबला), मंगेश मोरे (सिंथेसायझर), सुनील बेंडखळे आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) यांनी संगीतसाज चढवला. सुनीता पाटणकर यांनी निवेदनातून श्री विठ्ठल आणि संतांचे कार्य उलगडले. आराध्या साउंडचे सुरेंद्र गुडेकर यंनी ध्वनिसंयोजन केले. प्रवेशद्वारावर ऋतुजा मलुष्टे, ऐश्‍वर्या रानडे यांनी रेखाटलेली श्री विठ्ठलाची सुंदर रांगोळी लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमासाठी जयेश मंगल पार्क, मनोज पाटणकर, महेंद्र पाटणकर, विराज परब, तन्वी बाणे यांचे सहकार्य लाभले. शास्त्रीय संगीत शिकणार्‍या गौतमी वाडकर या विद्यार्थिनीला कार्यक्रमादरम्यान समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या ‘कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज’ टीमतर्फे गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या नावे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या वेळी प्राचार्य राजशेखर मलुष्टे, विष्णू सागवेकर, कल्याणी मलुष्टे, विजय रानडे, अभिजित गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sumiksha Murkar About 139 Days ago
Shravaniy karyakram thanx
0
0

Select Language
Share Link