Next
‘पीस फॉर चिल्ड्रन’ उपक्रमाची पुण्यात सुरुवात
सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांचा अभिनव उपक्रम
BOI
Wednesday, October 03 | 04:24 PM
15 0 0
Share this story

श्री दया फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्या उपस्थितीत ‘पीस फॉर चिल्ड्रन’ची महाराष्ट्रातील पहिली शाखा पुण्यात सुरू करण्यात आली.पुणे : देशभरात ठिकठिकाणी बालकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी तमिळनाडूमधील ‘श्री दया फाउंडेशन’ने ‘पीस फॉर चिल्ड्रन’ हा उपक्रम सुरू केला आहे. नुकतीच संस्थेच्या अध्यक्ष आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्या उपस्थितीत ‘पीस फॉर चिल्ड्रन’ची महाराष्ट्रातील पहिली शाखा पुण्यात सुरू करण्यात आली.

रजनीकांत यांची कन्या निर्माती-दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत, पंचशील रिआलिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, सिंबायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते माधव भांडारी, बीव्हीजी इंडिया लि.चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.   

लता रजनीकांत व पंचशील रिआलिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया‘पीस फॉर चिल्ड्रन’ ही बालकांसाठीची चळवळ म्हणून काम करेल, असे सांगून लता रजनीकांत म्हणाल्या, ‘मी गेली ४० वर्षे लहान मुलांसाठी काम करत आहे. देशात बालकांसाठी चांगले काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत; परंतु त्या एकमेकांशी जोडलेल्या नाहीत. अशा व्यक्ती व संस्थांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘पीस फॉर चिल्ड्रन’ मदत करेल. बालकांचे कुपोषण, बालकांवरील अत्याचार, हरवलेली मुले अशा विविध समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचा फायदा होईल. या उपक्रमाची महाराष्ट्रातील सुरुगांधी जयंतीच्या दिवशी व तीही पुण्यात होणे माझ्यासाठी खूप विशेष आहे. चांगल्या कामास हातभार लावण्यासाठी पुण्यात दिसून येणारी ऊर्जा आणि एकूणच महाराष्ट्रातून मला मिळत असलेला पाठिंबा ही खूप आनंदाची गोष्ट आहे.’

‘कोणत्याही महिलेच्या कामास पिता, भाऊ, पती यांच्याकडून पाठिंबा मिळत असेल, तर ते निश्चितपणे तिचा उत्साह वाढवणारे ठरते. मी करत असलेल्या कामाबद्दल माझी व रजनीकांत यांची नेहमीच चर्चा होते आणि माझ्या कार्याला ते कायम पाठिंबा आणि प्रोत्साहन देतात’, असेही लता रजनीकांत यांनी नमूद केले.

(लता रजनीकांत यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link