Next
महिंद्रा ‘एफईएस’तर्फे मेमध्ये २८ हजार युनिटची विक्री
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 04:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मे २०१८मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. मे २०१८मध्ये २८,१९९ युनिटची देशांतर्गत विक्री झाली. मे २०१७मध्ये ती २४ हजार ७१० युनिट होती.

मे २०१८मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत+निर्यात) २९ हजार ३३० युनिट इतकी झाली, तर गेल्यावर्षी याच काळात ती २५ हजार ७४९ युनिट होती. मेमध्ये एक १३१ युनिटची निर्यात करण्यात आली.

मासिक कामगिरीविषयी बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘आम्ही मे २०१८मध्ये २८ हजार १९९ ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या १४ टक्के अधिक आहे. अन्नधान्याचे व फुलशेतीचे चांगले उत्पादन येईल, अशा विक्रमी अंदाजामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल व ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात एक १३१ ट्रॅक्टरची विक्री केली व मे २०१७च्या तुलनेत नऊ टक्के वाढ साध्य केली.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link