Next
‘वेकफिट’ची ६५ कोटींची निधी उभारणी
प्रेस रिलीज
Friday, January 04, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील मॅट्रेस आणि संबंधित उत्पादनांच्या ‘वेकफिट’ने ३१.९ टक्के इक्विटीच्या बदल्यात सिकोया कॅपिटलकडून ६५ कोटी रुपये उभे केले आहेत. या गुंतवणुकीनंतर या स्टार्टअपचे मूल्यांकन आता २१० कोटींपेक्षा जास्त आहे.

हे स्टार्टअप प्रामुख्याने ऑटोमेशनची सुरुवात करून आपल्या निर्माण शाखेस मजबूत करण्यासाठी मिळालेल्या निधीतील १० ते १५ टक्के भाग वापरला जाणार असून, रोजच्या २५० मॅट्रेसच्या उत्पादनक्षमतेत वाढ करून ती ७०० मॅट्रेसपर्यंत नेणार आहे. स्टार्टअप इनोव्हेशनमध्ये आणखी गुंतवणूक करण्याची आणि नवीन उत्पादनांची श्रेणी सादर करण्याचादेखील प्रयत्न केला जाणार असून, यात वुड पल्प फायबरमधून बनलेल्या चादरी, कम्फर्टर, पिलो आणि स्लीपवेअर यांचा समावेश असेल.

‘वेकफिट’ची स्थापना २०१५मध्ये झाली. त्यानंतर संचालनाच्या केवळ सहा महिन्यांतच कंपनी नफा करू लागली. आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान या कंपनीचे उत्पन्न २७.६ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २.२ कोटी रुपये होता. २०१६-१७मध्ये तो ६.७ कोटी ३६ लाख इतका झाला होता. कंपनी २०१७ च्या आर्थिक वर्षात ३.५ पटीने वाढली आहे आणि या २०१८च्या आर्थिक वर्षात तिप्पट वृद्धी करण्याच्या मार्गावर आहे.

‘वेकफिट’चे सह-संस्थापक आणि मुख्य कायर्कारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, ‘आम्ही या अनोख्या स्टार्टअपच्या निर्मितीच्या प्रवासात सिकोया कॅपिटलसारख्या एका स्थिर गुंतवणूकदाराशी भागीदारी करून उत्साहित आहोत. देशभरात आमचे उत्पादन आणि पुरवठ्याची क्षमता सशक्त करण्यासाठी, ब्रॅंड निर्माण करण्यासाठी आणि सुयोग्य प्रतिभेस कामाची संधी देण्यासाठी या पैशांचा उपयोग केला जाईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search