Next
‘लघुपट निर्मितीपूर्वी माध्यम कळणे महत्त्वाचे’
प्रेस रिलीज
Tuesday, October 10 | 01:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माध्यम कळणे  महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले.

गांधी सप्ताहानिमित्त नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग (मालाड) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लघुपट निर्मिती’ या विषयावर गांधी भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अशोक राणे म्हणाले, ‘चित्रपट, लघुपट, माहितीपट यातील फरक समजावून घेतला पाहिजे. या निर्मिती क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या भरपूर संधी आहेत; मात्र त्याआधी हे माध्यम काय आहे हे समजावून घेतले पाहिजे. ‘फिल्म अॅकॅडेमिक्स’ विषयातही भरपूर काम होण्याची गरज असून तरुणांनी त्यातही रस घ्यावा. सतत चित्रपट पाहणाऱ्या माणसाला समाजात वाया गेलेला माणूस समजले जाते; मात्र सर्व प्रकारचे आणि सर्व भाषेतील चित्रपट पाहणे या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी आवश्यक गोष्ट आहे.’

या वेळी दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, प्रदीप देवरुखकर यांनीही मार्गदर्शन केले. महेंद्र तेरेदेसाई म्हणाले, ‘लघुपट हेही अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यातून आपण जे मांडणार ती गोष्ट महत्त्वाची असते. अनेकदा तंत्राकडे अधिक लक्ष दिले जाते आणि गोष्टींकडे दुर्लक्ष होते. गोष्ट चांगली असेल, तरच तंत्र आपल्याला मदत करते. गोष्ट सुचताना ती दृश्य भाषेत सुचणे ही या क्षेत्रातील यशाची पहिली पायरी असते.’  

श्रीराम टेकाळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link