Next
दिवाळीची तयारी + पन्नास प्रकारचे लाडू + चिवडा शेव फरसाण
BOI
Tuesday, October 30, 2018 | 10:13 AM
15 0 0
Share this article:

दिवाळीपूर्वी घराघरांतून चकल्या, करंज्या, चिवड्याचे खमंग वास येऊ लागतात. दिवाळीसाठी पारंपरिक पदार्थ्यांच्या कृती विशेष सूचनांसह ‘दिवाळीची तयारी’मधून दिले आहेत. दिवाळीसाठी महत्त्व व कथा देत खास रांगोळींची माहिती चित्रांसह दिली आहे.

वेगळी डिश म्हणून दही बटाटा पुरी, खेकडा भजी, झटपट वडे, रगडा पॅटीस, कच्छी दाबेली, मलई कॉर्नफ्लेक्स, दुधी हलवा असेही पदार्थ आहेत. वासंती काळे यांनी ‘पन्नास प्रकारचे लाडू’ या पुस्तकात नेहमीच्या लाडवांसह मुग, रवा व खवा, रवा-खोबरा, जोंधळ्याचे पीठ, चुट्टा चुरमा, नाचणी, मका, साबुदाणा, बटाट्याचे पीठ, कच्चे पोहे, वाटली डाळ असे विविध प्रकारच्या लाडूंची कृती दिली आहे.

वंदना वेलणकर यांच्या ‘चिवडा शेव फरसाण’मध्ये अनेक प्रकार आहेत. पुणेरी पालक चिवडा, ज्वारीचे पोहे, शेवया, स्पेशल कांदा-लसूण मिरगुंड चिवडा तसेच लसूण शेव, पालक जिरी मिरी, नारळाच्या दुधातील शेव असे भरपूर प्रकार आहेत. फरसाणमध्ये गाठी, पापडी, खारी, बुंदी, डाळमूठ असे पदार्थ आहेत.  

प्रकाशन : साठे प्रकाशन
पृष्ठे : २००
मूल्य : १६५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search