Next
‘अन्नपूर्णा परिवारा’तर्फे बालदिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, November 16 | 04:31 PM
15 0 0
Share this story


पुणे : अन्नपूर्णा परिवाराच्या वात्सल्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत येथील झोपडपट्टीतील लहान मुला-मुलींबरोबर बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये एकूण ६०० मुलांचा समावेश होता. झोपडपट्टीतील मुलांचे जीवन सुधारावे व बाल हक्कांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, या हेतूने अन्नपूर्णा परिवारातर्फे दर वर्षी बालदिन साजरा केला जातो.



गेल्या तीन दशकांपासून अन्नपूर्णा परिवार झोपडपट्टीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. ‘अन्नपूर्णा’च्या वात्सल्यपूर्ण या योजनेत बाल हक्क व महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जातो.  बालदिनानिमित्त मुलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी गायन, नृत्य अशा अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन केले होते.

‘अन्नपूर्णा’च्या अनेक योजनांमधून  बाल हक्क व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले जाते. गेल्या १५ वर्षांत पुण्यातील १४ वस्तींमध्ये १६ केअर सेंटर, तर मुंबईमध्ये चार केअर सेंटर उभारून अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी ‘अन्नपूर्णा’तर्फे मदत केली जात आहे.

या प्रसंगी ‘अन्नपूर्णा’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत म्हणाल्या, ‘वस्तीतील लहान मुलांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. गरिबीमुळे मुलांच्या बालपणावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा जगण्याकडे व विकासाकडे कायम लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठीच अशा प्रकारचे विविध उपक्रम लहान मुलांसाठी सातत्याने करणे गरजेचे आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link