Next
भारतीय समुद्री पर्यटन पोहोचणार नव्या उंचीवर
दोन रॉयल कॅरिबियन आंतरराष्ट्रीय जहाजांचे होणार आगमन
प्रेस रिलीज
Wednesday, February 20, 2019 | 01:45 PM
15 0 0
Share this story

स्पेक्ट्रम ऑफ दी सीज

मुंबई : भारतात समुद्री पर्यटन हळूहळू लोकप्रिय होऊ लागले आहे आणि आता टायरन (TIRUN) ट्रॅव्हेल मार्केटिंग त्यास प्रोत्साहन देत असून, ‘स्पेक्ट्रम ऑफ दी सीज’ आणि ‘एक्स्प्लोरर ऑफ दी सीज’ ही पुरस्कार विजेती क्रूझ लाइन दोन रोमांचक जहाजे भारतीय समुद्रकिनारी घेऊन येत असल्याचे रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलच्या भारतीय प्रतिनिधींनी जाहीर केले आहे. ही जहाजे २०१९मध्ये भारतात पोहोचणार असून, भारतीय प्रवाशांना त्यांच्या देशातून आशियातील इतर प्रेक्षणीय स्थानी समुद्रमार्गे जाण्याची संधी मिळणार आहे.

‘स्पेक्ट्रम ऑफ दी सीज’ हे क्वांटम अल्ट्रा क्लासमधील पहिले जहाज आहे आणि भारतात येणारे आणि भारतातून जाणारे हे सर्वांत मोठे जहाज आहे. त्याची क्षमता पाच हजार ६२२ प्रवाशांना सामावून घेण्याची असून, या जहाजाची लांबी एक हजार १३९ फुट आहे, जी त्याच्या बरोबरीच्या क्वांटम आणि ‘ओव्हेशन ऑफ दी सीज’पेक्षा जास्त आहे, जी सध्या आशियाची सर्वांत मोठी जहाजे आहेत. ‘स्पेक्ट्रम’वर अनेक समुद्रात पहिल्यांदाच बघायला मिळणारी स्काय पॅड, व्हर्चुअल रीअॅलिटी, बंगी ट्रॅम्पोलीन अनुभव आणि दोन-स्तरीय दोन हजार ८०९ वर्गफुटाची ११ प्रवाशांपर्यंतची अल्टिमेट फॅमिली स्वीट सुविधा, ज्यात इन-रूम स्लाईड तसेच नावीन्यपूर्ण डायनिंग संकल्पना आहे.

एक्स्प्लोरर ऑफ दी सीज

‘एक्स्प्लोरर ऑफ दी सीज’ हे रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलच्या ताफ्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पुरस्कार विजेते जहाज असून, ते प्रवाशांना अद्भुत अनुभव देईल. साहसाची आवड असणाऱ्यांसाठी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, ब्रॉडवे म्युझिकल्स, कसिनोमध्ये जिंकण्याचा उन्माद किंवा त्यांच्या विशेष थीम असलेल्या अनेक रेस्टोरंटपैकी कुठेतरी खाद्यपदार्थ आणि पेयांचा आस्वाद घेणे यांसारखे अनुभव प्रत्येक भारतीय प्रवाशाने या क्रूझवर घेतलेच पाहिजेत.

या बाबत बोलताना टायरन ट्रॅव्हेल मार्केटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण चड्ढा म्हणाले, ‘भारत हे क्रुझिंगसाठीचे विकासशील मार्केट आहे आणि आम्हाला आनंद आहे की, स्पेक्ट्रम आणि एक्स्प्लोरर भारतीय क्रुझप्रेमींना रॉयल कॅरिबियनच्या सेवा, सुविधा आणि बोटीवरील साहसांमधील अद्भुताचा आनंद चाखण्याची संधी देतील. आम्हाला खात्री आहे की, हा प्रवासी कार्यक्रम प्रवाशांना आवडेल आणि त्यांच्या मनात समुद्री प्रवासाची आवड जागवेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link