Next
सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट
प्रेस रिलीज
Saturday, November 03, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this article:



पुणे : नागरिकांचे आणि पर्यायाने शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुण्यातील महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कामगारांना या भेटवस्तूंचे वाटप खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महर्षी व्यास प्रतिष्ठानचे दिगंबर डवरी, आमदार भीमराव तापकीर, महादेव गोमबले, शंकरराव पाटील, संजय साष्टे, सुहास शेलार, रामदास भोसले, संजय कपिले आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘समाजात राहत असताना सार्वजनिक स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी ही सार्वजनिक स्वच्छता राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात, त्यामुळे त्यांच्याप्रती आपण कृतज्ज्ञ राहणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत महर्षी व्यास प्रतिष्ठान आणि दिगंबर डावरी गेली अनेक वर्षे काम करीत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. याबरोबरच आपणही सर्वांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर, पर्यावरणयुक्त ठेवण्यासाठी जागरूक राहत सक्रीय सहभाग घेऊया.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search