Next
इंगमार बर्गमन
BOI
Saturday, July 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

जागतिक कीर्तीचा श्रेष्ठ स्विडिश दिग्दर्शक इंगमार बर्गमनचा आज जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
...... 
१४ जुलै १९१८ रोजी उप्साल्लामध्ये (स्वीडन) जन्मलेला इंगमार बर्गमन हा आपल्या अप्रतिम कलाकृतींनी छाप पाडून गेलेला, जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक! तो दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध होता. सिनेमा, टेलिव्हिजन, रंगमंच आणि रेडिओ असा त्याचा चतुरस्र संचार होता. एकीकडे साठ सिनेमे दिग्दर्शित करत असताना त्याने दुसरीकडे १७०हून अधिक नाटकांचंसुद्धा दिग्दर्शन केलं होतं. वैशिष्ट्यपूर्ण कॅमेराफ्रेम्स आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा भावनिक कल्लोळ यांमुळे त्याच्या फिल्म्स काळजाला हात घालतात. त्याची कथा मांडण्याची पद्धत उत्कट असते. ‘क्रायसिस’ या फिल्मपासून त्याच्या करिअरची सुरुवात झाली. ‘सिक्रेट्स ऑफ विमेन’ आणि ‘समर विथ मोनिका’ या सिनेमांनी त्याचं काम नजरेत भरायला लागलं. ‘द व्हर्जिन स्प्रिंग’ला ऑस्कर मिळालं. स्माइल्स ऑफ ए समर नाइट, पर्सोना, अवर ऑफ दी वूल्फ, शेम, क्राइज अँड व्हिस्पर्स यांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. ‘दी सेवन्थ सील’ आणि ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ या फिल्म्स म्हणजे त्याचे मास्टरपीस मानले गेलेत. ‘फॅनी अँड अलेक्झान्द्र’लादेखील ऑस्कर मिळालं. नंतर आलेल्या थ्रू ए ग्लास डार्कली, विंटर लाइट आणि दी सायलेन्स या त्रि-सिनेधारेने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ‘थ्रू ए ग्लास डार्कली’साठी त्याला तिसरं ऑस्कर मिळालं. स्वीडिश भाषेत फिल्म्स बनवणाऱ्या बर्गमनने ‘द टच’सारख्या इंग्लिश फिल्म बनवल्या. त्याच्या ‘ऑटम सोनाटा’मधल्या इंग्रिड बर्गमनला कोण विसरेल? ३० जुलै २००७ रोजी त्याचा फॅरोमध्ये मृत्यू झाला. 
....... 

यांचाही आज जन्मदिन :
ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर (जन्म : १४ जुलै १८५६, मृत्यू : १६ जून १८९५) (आगरकरांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (जन्म : १४ जुलै १९२०, मृत्यू : २६ फेब्रुवारी २००४) 
अभिनेत्री सुधा शिवपुरी (जन्म : १४ जुलै १९३७, मृत्यू : २० मे २०१५) 
प्रसिद्ध उद्योगपती आणि एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर (जन्म : १४ जुलै १९४५) 
१९९२ साली ‘मिस युनिव्हर्स’ची रनर-अप ठरलेली फेमिना मिस इंडिया मधू सप्रे (जन्म : १४ जुलै १९७१)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link