Next
‘दासॉल्ट सिस्टीम्स’ कॉर्पोरेट कार्निव्हलमध्ये प्रथम
प्रेस रिलीज
Saturday, April 28 | 10:50 AM
15 0 0
Share this story

कॉर्पोरेट कार्निव्हल स्पर्धेत ६०० गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावणारी ​​‘दासॉल्ट सिस्टीम्स’ची टीम.

पुणे :
विविध क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी करत ‘दासॉल्ट सिटीम्स’ या संस्थेने कॉर्पोरेट कार्निव्हल स्पर्धेत सर्वाधिक म्हणजेच ६०० गुणांची कमाई केली आणि प्रथम क्रमांक पटकावला.​​

कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या खिलाडूवृत्तीचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत तब्बल १०० कंपन्यांचा सहभाग होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धांमध्ये ‘बीएनवाय मेलन’ने ५९० गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर ५२० गुणांसह ‘अॅसेंचर’ तृतीय क्रमांकावर राहिली.

फेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ट्विडल डिझायनोग्राफी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या कॉर्पोरेट कार्निव्हल स्पर्धा सात ते २२ एप्रिल या कालावधीत रंगल्या. फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि गायनाच्या स्पर्धांचा त्यात समावेश होता.

कार्निव्हलमधील फुटबॉल सेव्हन्स स्पर्धेत ‘बीएनवाय मेलन’ने ‘ऑलस्टेट सोल्युशन्स’चा २-०, तर फुटबॉल फाईव्हमध्ये ५-२ असा पराभव करीत दोन सुवर्णपदके पटकावली. फुटबॉल सेव्हन्समध्ये ‘दॉईश बॅंके’ने ‘एन्प्रो इंडस्ट्रीज’ला २-० आणि फाईव्ह्जमध्ये ‘अमुरा मार्केटिंग टेक्नोलॉजीज’ने ‘दासॉल्ट सिस्टीम्स’ला ५-३ असे पराभूत करून काँस्य पदकावर आपले नाव कोरले. ‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स’चे भूपेंद्र राजपूत व शशांक मोहोळ, ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’चे हितेश शेलार, ‘ह्युंदाई’चे अमोल लाटे यांच्या हस्ते विजेत्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

फुटबॉल फाईव्हमध्ये सुवर्णपदके पटकावलेली ‘बीएनवाय मेलन’ची टीम.

बॉक्स क्रिकेटच्या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ‘इमर्सन’ संघाने ‘दॉईश बॅंके’चा चार गडी राखून पराभव केला. ‘इमर्सन’ने ४.२ षटकांमध्ये एक गडी गमावून ‘दॉईश बँके’ला जिंकण्यासाठी ३० धावांचे आव्हान दिले होते; मात्र दॉईश बँकेचा संघ सर्व गडी गमावून २८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ‘एडियंट इंडिया’ने ‘अॅसलट्री’चा १० धावांनी पराभव करून काँस्य पदक जिंकले. ‘एडियंट इंडिया’ने ५ विकेट गमावून ५८ धावा करण्याचे आव्हान ‘अॅक्सलट्री’ला दिले होते. मात्र,‘अॅक्सलट्री’ने सर्व गडी गमावून ४७ धावा केल्या.

टेनिसच्या पुरूष एकेरी स्पर्धेत ‘श्लमबर्जर’च्या विवेक खाडगे यांनी ‘एक्सटास कॉर्प’च्या दीपक पाटील यांचा ६-४ ने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ‘स्क्वेअर फीट इन्टेरिअर्स’च्या सुनील लुल्ला यांनी ‘कॉग्निझंट’च्या चनाबसवकुमार यांना ६-३ ने हरवून काँस्य पदक मिळवले.

टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत ‘श्लमबर्जर’चे विवेक खाडगे व ‘स्क्वेअर फीट इन्टेरिअर्स’चे सुनिल लुल्ला यांनी ‘दासॉल्ट सिस्टीम्स’च्या शिवाशीष बेहेरा आणि महेश सिनरे यांचा ६-१, ५-७, १०-३ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. ‘ऑलस्टेट सोल्युशन्स’चे आलोक गुप्ता आणि ‘कॉग्निझंट’चे चनाबसवकुमार हे काँस्य पदकाचे मानकरी ठरले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link