Next
बालकांमधील स्थूलपणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोहीम
‘जेटी फाउंडेशन’चा अभिनव उपक्रम
प्रेस रिलीज
Thursday, August 16 | 05:38 PM
15 0 0
Share this story

‘स्थूलपणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुणे डॉ. डी. वाय. पाटील, हणमंतराव गायकवाड, डॉ. जयश्री तोडकर, महेश शहा आदी मान्यवर

पुणे : लहान मुलांमधील स्थूलतेची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून, स्थूल मुलांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. एका अहवालानुसार, देशातील तब्बल १४.४ दशलक्ष बालकांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे. या स्थितीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढतच चालले आहे. हे लक्षात घेऊन ‘जेटी फाउंडेशन’ने मुलांनाच या बाबतीत जागरूकतेचे दूत बनविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, ओ क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल आणि नवनीत प्रकाशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.  

यासाठी पुण्यातील ४५ शाळांमध्ये ‘स्थूलपणा’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पंधरा हजारपेक्षा अधिक मुलांनी यात भाग घेतला. त्यातील निवडक शंभर चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि बीव्हीजी समुहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड उपस्थित होते. त्यापैकी १४ सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड करून, त्या मुलांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

या वेळी  पंधरा वर्षांपासून स्थूलपणाविरुद्ध चळवळ उभारणाऱ्या आशियातील पहिल्या महिला बेरिअॅट्रिक शल्यविशारद जेटी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, ‘१६ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या फाइट चाइल्डहूड ओबेसिटी (बालकांमधील स्थूलपणाविरुद्ध लढा) कॅम्पेनचे हे पुढील पाऊल आहे. आता आम्ही ही चळवळ एका वेगळ्या पातळीवर घेऊन जात आहोत. समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच बालकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्थूलपणाविषयी माहिती देणार आहोत आणि त्यांना याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करणार आहोत. बालक हा कुटुंबातील पहिला संदेशवाहक आणि पहिला पीडित असतो. त्यामुळे त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही पुण्यातील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा सुरू करण्याआधी मुलांना स्थूलपणाविषयी माहितीपट दाखविण्यात आला, विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर मुलांना स्थूलपणाविषयीचे त्यांचे विचार चित्राच्या रूपाने व्यक्त करण्यास सांगण्यात आले. स्थूलपणाविषयीची ही सर्वोत्कृष्ट चित्रे या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर असतील.’

‘रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क’चे अध्यक्ष महेश शहा म्हणाले, ‘आरोग्यदायी आणि जंक फूड याविषयी मुलांना लहानपणापासूनच माहिती देणे महत्त्वाचे असते. लहानपणी जडलेल्या सवयी आणि मिळालेले ज्ञान आयुष्यभर राहते. या उपक्रमामुळे मुलांमध्ये निश्चितच या विकाराविषयी जागृती निर्माण होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link