Next
कोकणात भातकापणीसाठी प्रथमच यंत्राचा प्रयोग
BOI
Tuesday, October 09, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
कोकणातील भातशेतीमध्ये दिवसेंदिवस मनुष्यबळाची कमतरता ही अडचण मोठी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेने पंजाबहून कंबाइन राइस हार्वेस्टर मागवला आहे. हे मशीन एका तासात दीड एकरवरील भाताची कापणी आणि मळणी करू शकते. मुख्य म्हणजे मशीनचा आकार लहान असल्यामुळे कोकणातील छोट्या खाचरांसाठीही ते उपयुक्त ठरू शकते. कोकणातील हे पहिले मशीन असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

या मशीनच्या स्टोअर टँकमध्ये वीस मण (आठ क्विंटल) भात राहू शकते. त्यानंतर ते भात ट्रॅक्टर ट्रॉलीने किंवा पाइपच्या साह्याने बाहेर ओतले जाते. हे मशीन डिझेलवर चालते. या मशिनमधून मळणीनंतर नेहमीप्रमाणे पेंढा मिळणार नसून, ‘गुत’ मिळणार आहे. ते गवत गुरांना खाण्यास पेंढ्यापेक्षा चांगले असेल. या मशीनमुळे वेळेचीही बचत होणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्थसाह्याने संस्थेने हे मशीन उपलब्ध केले आहे. प्रत्येक गावात आठ ते दहा लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा कंबाइन हार्वेस्टर घेतला, तर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. मजुरीच्या प्रश्नामुळे कमी होत चाललेली भातशेती पुन्हा वाढविण्याचा विचार शेतकरी करतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला.

यापूर्वी या संस्थेने भात कापणी यंत्र (रिपर), भात मळणी यंत्र (पॅडी थ्रेशर), भात लावणी यंत्र (राइस ट्रान्स्प्लांटर), भातशेतीसाठी चिखलणी यंत्र (पडलर) अशी यंत्रसामग्री संस्थेचे कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर  आणली आहे. तिचाही उपयोग केला जातो.

या नव्या मशीनचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते झाला. या वेळी आरडीसीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जीवन गांगण, ए. बी. चव्हाण, रावसाहेब सुर्वे, मानसिंग महाडिक, मनोहर महाडिक, सुरेश खापले, निखिल चोरगे, प्राचार्य आर. टी. जाधव, डॉ. सलील मोडक, डॉ. संकेत कदम उपस्थित होते.

कंबाइन राइस हार्वेस्टरची वैशिष्ट्ये :
- या मशीनला चालण्याकरिता लोखंडी चेन नसून, रबरी चेन आहे. त्यामुळे ते डांबरी रस्त्यावरून कोठेही नेता येते. 
- कापणी यंत्राची रुंदी सहा फूट असल्याने कोकणातील लहान खाचरांतही हे मशीन चालू शकते. 
- दिवसाकाठी आठ ते दहा एकरवरील कापणी कापून भात घरी आणता येऊ शकते.

(यंत्राची झलक पाहा सोबतच्या छोट्या व्हिडिओत...) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BAl Gramopadhye About 89 Days ago
In the long run , it's use may prove economical . This should be studied , not as part of politics . This need not be Politics . This will affect all . P
0
0
रमेश दौलतराव महाडिक About 182 Days ago
combine Rice Harvester
0
0
किरण सुरेश नेवगी About 275 Days ago
भात कापणी आणि मळणी यंत्र चांगले आहे परंतु त्याची किंमत किती आहे?
0
0

Select Language
Share Link
 
Search