Next
रस्ते बांधणीसाठी प्लास्टिक कचऱ्याचा वापर
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, July 03, 2019 | 11:54 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘रस्ते तयार करताना प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून योजना तयार केली जात आहे. यामध्ये रस्ता तयार करताना सिमेंटऐवजी प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग करण्यात यावा, यासाठीही सरकार प्रयोगशील आहे,’ असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीच्या नियमाच्या उल्लंघनाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी बोलताना कदम यांनी रस्ते बांधणीत प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करणार असल्याचे सांगितले.  

रामदास कदममहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे; मात्र सरकार प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विघटनावर काय करीत आहे, असा प्रश्न आमदार लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबरोबरच प्लास्टिक बंदीनंतर २००हून अधिक कारखाने बंद झाले आहेत, त्यामुळे तब्बल १० हजार लोक बेरोजगार झाले आहेत. त्या बेरोजगार लोकांसाठी सरकारची काय योजना आहे. देशातील काही राज्यांमध्ये सरकारकडून प्लास्टिकच्या कचऱ्यापासून डिझेल तयार केले जात आहे, याबाबत सरकार काय विचार करीत आहे, असे प्रश्न लोढा यांनी उपस्थित केले होते. या चर्चेत आमदार अजित पवार, मनिषा पवार, राज के पुरोहित यांनीही सहभाग दर्शविला. या शिवाय प्लास्टिक बंदीच्या नियमावरील कडक कायदे व नियमांचे होणारे उल्लंघन आणि प्लास्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष केंद्रीत केले.

या वर बोलताना कदम म्हणाले, ‘प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध असतानाही गुजरातहून महाराष्ट्रात प्लास्टिक आणले जात आहे. जे रोखण्याची मागणी गुजरात सरकारकडे करण्यात येणार आहे. सोबतच प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी सरकार यासंदर्भात योजना तयार करणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search