Next
हातखंबा येथे २६ जूनला आरोग्य तपासणी शिबिर
BOI
Saturday, June 22, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, हातखंबा येथील रिलायन्स पेट्रो मार्केटिंग लिमिटेड, रत्नागिरी रिटेल आउटलेट व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून २०१९ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील रिलायन्स पेट्रोल पंप येथे होणार आहे.

या शिबिरात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत ट्रक चालक, क्लीनर यांची आरोग्य, रक्त व रक्तातील साखरेचे प्रमाण आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी केले आहे. 

शिबिराविषयी : 
दिवस : बुधवार, २६ जून २०१९
वेळ : दुपारी दोन ते सहा 
स्थळ : रिलायन्स पेट्रोल पंप, हातखंबा, रत्नागिरी 
संपर्क : 
राजेश कांबळे (रिलायन्स फाउंडेशन) : ८४५१९ ०५५५३, ९०९६५ ३९१७९
रविराज बने (रिलायन्स पेट्रोल पंप) : ९९२२३ ९११३३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search