Next
पेटीएमचा ग्राहकांसाठी ‘लॉयल्टी पॉईंट’ उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, December 22 | 05:33 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पेटीएम या भारताच्या सर्वात मोठ्या मोबाइल फर्स्ट आर्थिक सेवा मंचाने ‘पेटीएम लॉयल्टी पॉईंट्स’ उपक्रम सुरू केला असून, हे पॉईंट्स ग्राहक विविध व्यवहारांमधून मिळवू शकतात.

या मंचावर ग्राहकांना मिळणारे सर्व कॅशबॅक ‘पेटीएम लॉयल्टी पॉईंट्स’ म्हणून गोळा होतील. हे पॉईंट्स ऑनलाइन मंचावरून किंवा पेटीएम स्वीकारणाऱ्या पाच मिलियनपेक्षा जास्त व्यापारी केंद्रांवरून मिळवता येतील. येत्या वर्षात कंपनी या ऑफरमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये दाखल करणार आहे.

व्यापक उपयोगकर्त्यांना बक्षीस देऊन डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करणे, पेटीएमच्या ऑफलाइन व्यापारी भागीदारांना त्यांचा व्यवसायवाढीची संधी; तसेच समस्त ईकोसिस्टम एकत्र आणून उपयोगकर्त्यांना केव्हाही आणि कुठेही कमावण्यासाठी, जमवण्यासाठी आणि रिडीम करण्यासाठी सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अॅबोट म्हणाले, ‘आम्ही आमच्या लाखो उपयोगकर्त्यांचे ऋणी आहोत, ज्यांनी आम्हाला देशातील सर्वात पसंतीचा पेमेंट मंच बनविले आहे. पेटीएम ‘लॉयल्टी पॉईंट्स’द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना एक आकर्षक अनुभव देऊ करत आहोत. आमचे ग्राहक आता पेटीएमद्वारे किंवा कोणत्याही मुख्य ऑनलाइन मंचाद्वारे आणि ऑफलाइन व्यापारी केंद्रावर व्यवहार करत असताना ‘लॉयल्टी पॉईंट्स’ कमवू आणि रिडीम करू शकतात. यामुळे आमच्या वापरकर्त्यांना पेटीएमचा वापर करूनच व्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच आमच्या व्यापारी भागीदारांचा व्यवसाय वाढेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link