Next
धनंजय चितळेंच्या व्याख्यानाला रत्नागिरीत प्रतिसाद
BOI
Monday, May 13, 2019 | 02:27 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील श्री. गोविंद कृ. रानडे संस्कृत पाठशाळा येथे आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘श्री विष्णुसहस्रनामावरील आद्य शंकराचार्यांचे भाष्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

चितळे यांनी शंकराचार्यांची महती, त्यांचे भाष्यग्रंथ, टीका, स्तोत्र याची थोडक्यात माहिती सांगून, विष्णुसहस्रनाम नित्यपठणाचे फायदे सांगितले. विष्णू ही हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्‍वाचा पालक म्हटले गेले आहे. श्री विष्णू संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. केवळ जयंतीच्या दिवशी आद्य शंकराचार्यांचे स्मरण करण्यापेक्षा दररोज सर्वांनी विष्णुसहस्रनामाचे पठण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. प्रारंभी स्वानंद पठण मंडळाच्या सदस्यांनी विष्णुसहस्रनाम म्हटले. त्यानंतर प्रमुख वक्ते चितळे यांचा परिचय प्रतिभा प्रभुदेसाई यांनी करून दिला. संस्थेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांच्या हस्ते चितळे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेचे कार्यवाह जयराम आठल्ये यांनी संस्थेचे अध्यक्ष वैद्य भिडे आणि उपाध्यक्ष अच्युत फडके यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख वक्त्यांच्या हस्ते स्वानंद पठण मंडळाच्या भगिनींना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.

वैद्य भिडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यवाह जयराम आठल्ये यांनी मान्यवरांचे व श्रोत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक विनायक पोखरणकर, लेखक सुभाष भडभडे, वनस्पती अभ्यासक विनायक बापट, निवृत्त शिक्षक श्री. रायकर, पुरोहित आदींसह अनेक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओंकार पाध्ये यांनी मेहनत घेतली. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search