Next
भारतातल्या शहरांत ‘फोक्सवॅगन अमियो’ रोड शो
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 10:24 AM
15 0 0
Share this storyमुंबई : प्रिमीयम दळणवळणाला नवीन दृष्टिकोन बहाल करणाऱ्या ‘फोक्सवॅगन’ या युरोपीय चारचाकी उत्पादक कंपनीने त्यांच्या बहुशहरी अमियो रोड शोची घोषणा केली असून, हा रोड शो भारतातल्या २५०हून अधिक शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. १४ एप्रिल २०१८ पासून सुरू होणारा हा मेड-फॉर इंडिया आणि मेड-इन-इंडिया ‘फोक्सवॅगन अमियो रोड शो’ ३० हजार किमीचे अंतर येत्या चार महिन्यांत पार करणार आहे.

पश्चिमेकडील महाराष्ट्र, पूर्वेकडे उत्तरांचल, उत्तरेकडे हरियाणा आणि दक्षिणेकडे कर्नाटक या राज्यांमधून अमियो कँटर संपूर्ण देशातले चारही प्रदेश पादाक्रांत करेल. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दडलेल्या सक्षम व नव्या ग्राहकांना ‘फोक्सवॅगन’ची नवी भारतीय कारलाईन दाखवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ग्राहकांना आकर्षित करणे, हे अमियो बहुशहरी रोड शोचे ध्येय आहे. या रोड शोच्या माध्यमातून भारतातील सक्षम ग्राहकांना अमियो या मेड-फॉर-इंडिया आणि मेड-इन-इंडिया चारचाकीच्या टेस्ट ड्राईव्हची संधीही मिळणार आहे. या व्यतिरिक्त, टेस्ट ड्राईव्हमधून या गाडीचे फीचर्स जाणून घेऊन लवचिक वित्तसेवा पर्यायांसह ऑन-द-स्पॉट बुकिंग करण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना फोक्सवॅगन पॅसेंजर कार्सचे संचालक स्टिफन नॅप म्हणाले, ‘फोक्सवॅगन अमियोच्या सादरीकरणातून भारतीय बाजारपेठेतील आमच्या प्रतिबद्धतेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. खास भारतीय ग्राहकांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या चारचाकींसह, येथील ग्राहकांना आमची सर्वोत्कृष्ट उत्पादने देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. भारतातील सर्व ग्राहकांसाठी अमियो सादर करताना आम्हाला आनंद होत असून, प्रादेशिक ग्राहकांशी आमची नाळ घट्ट जोडण्यासही आम्ही उत्सुक आहोत.’

भारतीय परिचालनाचे एकत्रीकरण करून येत्या पाच वर्षांत बाजारपेठेतील समभागात तीन टक्क्यांची वाढ करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या ‘फोक्सवॅगन’ने भारतीय बाजारपेठेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच आता बदलला आहे. प्रत्येक उत्पादनाच्या केंद्रस्थानी ग्राहकाला ठेऊन तयार करण्यात आलेल्या या बहुशहरी रोड-शोमधून ‘फोक्सवॅगन’ची ब्रॅंड जागरुकता विकसित होणार असून, भारतीय ग्राहकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

‘फोक्सवॅगन अमियो’विषयी :
तरुण भारतीय ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आता अमियो ही चारचाकी दोन प्रकारच्या इंधन पर्यायांत उपलब्ध होत असून, यात १.० लीटर ३- सिलेंडर एमपीआय आणि १.५ लीटर ४- सिलेंडर टीडीआय इंजिनाचा समावेश आहे. ‘फोक्सवॅगन’साठी सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची असून, अमियो या गाडीमध्ये दोन फ्रंट एअरबॅग्स, एबीएस या सुविधा स्टॅंडर्ड सुरक्षा यंत्रणा म्हणून देण्यात आल्या आहेत. अमियोमध्ये थोडा स्टायलिशपणा आणण्यासाठी यात अत्याधुनिक टचस्क्रीन मल्टीमिडिया सिस्टीम, क्रूझ कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, सेंटर आर्म रेस्ट, अॅंटीपिंच पॉवर विंडोज आणि स्टॅटिक कॉर्नरिंग लाईट्स देण्यात आले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link