Next
‘विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी’
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन
प्रेस रिलीज
Wednesday, October 17, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:औंध : ‘साहित्य माणसाला समृद्ध करते. आपण जे प्रत्यक्षात पाहू शकत नाही. ते विश्व आपण पुस्तकांच्या माध्यमातून पाहू शकतो. पुस्तक हे चालते बोलते व्यासपीठ आहे. पुस्तके सुखात-दुःखात मित्राप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वयात पुस्तकांशी मैत्री करावी,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापिका विजया सरोदे यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

‘ज्ञान ही जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे. जे वाटल्याने वाढतच राहते. जगातील श्रेष्ठ संपत्ती मिळवण्यासाठी आपण सातत्याने वाचन करणे गरजेचे आहे. ‘वाचाल तर वाचाल’  असे त्यामुळेच म्हटले जाते,’ असे सरोदे यांनी सांगितले.प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तके वाचणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी आणि ग्रंथांशी मैत्री करायला हवी. दररोज वर्तमानपत्रे,  पुरवण्या, नियतकालिके, मासिके, दिवाळी अंकाचे वाचन करायला पाहिजे. मराठी साहित्यामधील वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, विंदा करंदीकर, वि. वा. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे, दुर्गा भागवत, गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर,  सानिया, कविता महाजन, इंदुमती जोंधळे इतर लेखकांचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे; तसेच भारतीय साहित्याबरोबर आपण अनुवादित साहित्य वाचल्यास,  आपणास परकीय संस्कृतीचा परिचय होतो. तसेच आपले जीवन समृद्ध होईल. वाचन प्रेरणा दिनानिमित्त यापुढे जे विद्यार्थी ग्रंथालयातील अधिकाधिक पुस्तके वाचतील त्या वाचक विद्यार्थ्यांना मराठी विभागामार्फत आणि महाविद्यालयातर्फे चांगले पारितोषिक देण्यात येईल.’

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वर्गात जाऊन मराठी साहित्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रकट वाचन केले. यामध्ये नेहा काकडे, चंद्रकांत सोनवणे, मोनाली भालवणकर, सुदेश भालेराव, आनिता शिंदे, सोमनाथ कुलकर्णी, आरती शिंदे, मयुरी चिमटे,  रसिका मिरेकर आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी करून दिली. प्रा. श्रीमती नलावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. श्रीमती कचरे, प्रा. वाघ, प्रा. पाटोळे, डॉ. अतुल चौरे यांबरोबरच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
DR. ATUL CHOURE About 184 Days ago
Very Nice...
1
0

Select Language
Share Link
 
Search