Next
आमदार भोसले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
प्रेस रिलीज
Monday, November 13 | 05:59 PM
15 0 0
Share this story

आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दळवी रुग्णालयात विमा पॉलिसीचे वितरण करताना रेश्मा भोसले, देविका काकडे.पुणे : आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या दळवी रुग्णालयात गरोदर महिला व नवजात बालकांच्या नावाने विमा पॉलिसी नोंदणी व वितरण करण्यात आले.

नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळ, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, नरवीर ग्रुप, कट्टा ग्रुप, श्रीकृष्ण मित्र मंडळ, गोळी ग्रुप व खैरेवाडी येथील वीर चाफेकर तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

दळवी रुग्णालयात ३० जणांचा प्रत्येकी एक लाखाचा अपघाती विमा उतरवण्यात आला. यामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या २५ गरोदर माता आणि पाच शिशुंचा समावेश आहे. विमा कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत रेश्मा भोसले, देविका काकडे यांच्या हस्ते पॉलिसी अर्ज नोंदणी व वितरण करण्यात आले. या वेळी बसंत मिश्रा, प्रसाद मिश्रा, राखी राजपूत उपस्थित होते.

आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करताना मान्यवर.यानंतर नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी विद्यामंदिर, संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा क्रमांक ११९ बी व ६१ जी आणि ६१ मुलींची शाळा, खैरेवाडी येथील दादासाहेब थोपटे मनपा शाळा क्रमांक ५७ या शाळांमधील एक हजार ३५० विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आबा भोसले, हिरालाल कासट, बाळा दारवटकर, गोपाळ देशमुख, विजय आल्हाट, मलंग सय्यद, धनंजय धाकतोडे, सुनील माळी, बाबा हेंद्रे, गणेश जाधव, अमित पाचुंदकर, रोहिणी वाघ, मनीषा देशमुख, युवराज चिंचणे, अनिकेत कापरे, किरण घाडगे, प्रसाद भिलारे, संदीप सावंत, विनायक मोरे, बाळासाहेब तनपुरे, बाबू दुद्डे, मुख्याध्यापिका नंदा डोळस, उपशिक्षक मीनाक्षी गुरव, संजीवनी सोनार, चंद्रशेखर वाघ, श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link