Next
‘क्लिअरटॅक्स’द्वारे ‘जीएसटीआर-९’ सॉफ्टवेअर सादर
जीएसटी वार्षिक ऑडिट अचूक भरण्यासाठी होणार मदत
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 01:56 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारताच्या आघाडीच्या टॅक्स, जीएसटी अनुपालन आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीत अग्रेसर ‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटीआर-९ फायलिंग’ सॉफ्टवेअर सादर केले आहे. हे सॉफ्टवेअर सनदी लेखापाल (सीए) तसेच व्यावसायिकांना कोणत्याही अडचणीशिवाय ‘जीएसटीआर-९’ भरण्यासाठी मदत करणार आहे. 

‘जीएसटीआर-९’ फॉर्म म्हणजे जुलै २०१७ ते मार्च २०१८ मध्ये भरलेल्या सर्व जीएसटी रिटर्न्सचा सारांश आहे. यात सुधारणा आणि पुरवठा चलनांचादेखील समावेश आहे, जे मार्च २०१९ पर्यंत दाखल करायचे होते. २१ महिन्यांचा जीएसटी डेटा आपल्या अकाउंटिंग बुक्सशी अचूक मिळविणे, तसेच काही विसंगती असल्यास ती शोधून त्यानुसार ‘जीएसटीआर-९’ फाइल करणे हे व्यवसायांकडून अपेक्षित आहे. 

‘क्लिअरटॅक्स’चे ‘जीएसटीआर-९’ सोल्युशन जवळजवळ या संपूर्ण फॉर्मची स्वतः आकडेमोड करून या संपूर्ण प्रक्रियेचे ऑटोमेशन करते. एका विस्तृत चेकलिस्टमध्ये रिटर्नमध्ये असलेल्या समस्या शोधून काढल्या जातात व त्यायोगे यूझरला फायलिंग करतेवेळी त्या चुका टाळण्यासाठी सावध केले जाते.

या विषयी बोलताना ‘क्लिअरटॅक्स’चे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणाले, ‘आम्ही रिटर्न फायलिंगची एक विश्वसनीय आणि सुलभ आवृत्ती सादर केली आहे, जी सीए आणि व्यावसायिकांना ‘जीएसटीआर-९’ सुरळीतपणे फाइल करण्यास मदत करेल. त्यांना फक्त इतकेच करायचे आहे की, सरकारी वेबसाइटवरून आपला डेटा एक क्लिक करून इम्पोर्ट करायचा, व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल काही प्रश्नांची उत्तरे द्यायची, गरज वाटल्यास ‘जीएसटीआर-९’ रिपोर्टचा आढावा घ्यायचा आणि मग काही मोजक्या क्लिकद्वारे फायलिंगचे काम संपवायचे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search