Next
शहीद जवानांना तीन विद्यार्थ्यांची गाण्यातून श्रद्धांजली
BOI
Monday, February 25, 2019 | 06:32 PM
15 1 0
Share this article:

ऋषभ पुरोहितपुणे : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४०पेक्षा अधिक जवान शहीद झाले. देशभरात दुःख, संताप, शोकाची लहर उसळली. वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात ११वीत शिकणाऱ्या तीन युवकांनी गाण्याच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘तुम ये क्या कर चले’ हे आग्रा येथील मोहमद तैमूर यांनी लिहिलेले गीत ऋषभ पुरोहित याने गायले असून, त्याने आणि त्याचे वडील सचिन पुरोहित यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. 
अमन निर्मल
चैतन्य कुलकर्णी याने पियानोची साथ केली आहे. याचा व्हिडिओ अमन निर्मल याने बनवला आहे. त्यांनी हा व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रदर्शित केला आहे. 

त्यांना संगीत, गीतलेखन, सिनेमेटोग्राफी यात  रस आहे. ऋषभ वयाच्या चौथ्या वर्षापासून पंडित विवेक जोशी यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सचिन पुरोहितही गायक आहेत. त्यांनीही या मुलांना अशा पद्धतीने जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले.   
 
चैतन्य कुलकर्णी
‘दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हे वीर जवान शहीद झाले. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. देशभरातील जनतेने कायम त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे. हा संदेश आम्हाला द्यायचा होता. आम्हाला वैयक्तिकरीत्या फार आर्थिक मदत करणे शक्य नव्हते; पण आमच्याजवळ जी कला आहे, तिच्या माध्यमातून आपण आपल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करावी, ज्या वीर जवानांच्या जीवावर आपण सुखाने राहतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने आम्ही हे गाणे करायचे ठरवले,’ असे ऋषभ पुरोहित याने सांगितले. 

मोहमद तैमुर
‘यासाठी एका योग्य गीताच्या शोधात असताना माझ्या परिचयातील असलेल्या आग्र्याच्या मोहमद तैमूरला मी ही संकल्पना सांगितली. त्यालाही ती आवडली आणि त्याने आम्हाला हे गीत लिहून दिले. अवघ्या तीन दिवसांत आम्ही हे गीत आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. वीर जवानांप्रति आम्ही आमच्यापरीने आमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे ऋषभने सांगितले. 

(ऋषभ पुरोहित, चैतन्य कुलकर्णी आणि अमन निर्मल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तयार केलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sayali Mohite About 210 Days ago
Beautiful song....very touching...gr8 work by young generation.Hatsoff to parent's who really gave oprtunity to yong generation for such a nice work.
0
0

Select Language
Share Link
 
Search