Next
काजोल-शाहरुख पुन्हा एकत्र
‘हिंदी मिडियम’च्या सिक्वेलमध्ये करणार स्क्रीन शेअर
BOI
Tuesday, December 18 | 02:47 PM
15 0 0
Share this story

अभिनेत्री काजोल आणि शाहरुख खान

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेली सुपरहिट जोडी शाहरुख खान आणि काजोल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या आगामी सिक्वेलमध्ये हे दोघे एकत्र काम करणार आहेत.  

‘दिलवाले दुल्हनिया..’ चित्रपटापासून शाहरुख-काजोल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या समोर आली आणि प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. आजतागायत ही जोडी बॉलीवूडच्या असंख्य चाहत्यांच्या पसंतीची आहे. मुख्य भूमिकेत नसले, तरी शाहरुख-काजोल यांचा चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. अभिनेता इम्रान खान आणि सबा कमर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा आगामी सिक्वेल दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला आहे. 

२०१७मध्ये आलेल्या हिंदी मिडियम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. अशा चित्रपटाच्या सिक्वेलसाठी काजोल-शाहरुख यांना सिक्वेलची कथा ऐकवण्यात आली होती. त्यावर हे दोघेही यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र दिसली, तर उत्सुकतेचीच बाब आहे. खरे तर फेब्रुवारी २०१८मध्येच ‘हिंदी मिडियम’च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती, परंतु इम्रान खानच्या आजारपणामुळे चित्रपटाला विलंब झाला. या चित्रपटाचे चित्रिकरण अमेरिकेत होणार असून दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link